शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

अनपेक्षित आरक्षणाने उमेदवारांची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST

कोल्हापूर : शहरातील सर्वात जुनी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या दौलतनगर प्रभागात अनुसूचित जाती महिला या अनपेक्षित आरक्षणाने अनेक मातब्बरांची ...

कोल्हापूर : शहरातील सर्वात जुनी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या दौलतनगर प्रभागात अनुसूचित जाती महिला या अनपेक्षित आरक्षणाने अनेक मातब्बरांची दांडी गुल केली आहे. वर्षानुवर्षे बांधणी केलेला मतदारसंघ आता आरक्षणामुळे सोडावा लागत असल्याने आपल्याच मर्जीतील आणि तोही स्थानिक उमेदवार देण्यासाठी शोधाशोध सुरू झाली आहे. उमेदवारच ठरत नसल्यामुळे अजून येथील लढतीचे चित्र स्पष्ट होत नाही. पण विलास वास्कर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केल्याचेही दिसत आहे.

दौलतनगर या प्रभागाचे सर्वसाधारण मतदान ६६०० इतके आहे, पण यावर्षी डवरी वसाहत, अंबाई डिफेन्स आणि शिवाजी विद्यापीठ येथील ४०० ते ५०० मतदान या प्रभागात समाविष्ट झाल्याने मतदारांचा आकडा ७३२४ वर पोहोचला आहे. या प्रभागाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांसाठी निश्चित झाले आहे. अशाप्रकारचे आरक्षण पहिल्यांदाच पडले आहे. यापूर्वी हा प्रभाग सातत्याने खुला राहिला होता. विद्यमान नगरसेवक विलास वास्कर यांनी दोन वेळा येथून प्रतिनिधीत्व केले आहे. गेली पाच वर्षे केलेल्या विकास कामांच्या जोरावर यावेळी त्यांची प्रबळ दावेदारी होती, पण ऐनवेळी प्रभाग एससी महिला झाल्याने त्यांना नव्या प्रभागात जावे लागत आहे. त्यांनी आता प्रतिभानगर या प्रभागातून पत्नीस उतरवण्याची तयारी केली आहे. पण दौलतनगर हा त्यांचा पारंपरिक प्रभाग असल्याने येथील पकड ठेवण्यासाठी आपल्याच मर्जीतील उमेदवार देण्यासाठी त्यांनी जातीचा दाखला असणारा प्रबळ उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे.

येथे अनुसूचित जातीची संख्या अवघी १३ टक्के आहे, त्यामुळे ताकदीचा उमेदवार शोधताना दमछाक होत आहे. स्थानिक उमेदवार फारसे ताकदीचे नसल्याने आजुबाजूच्या प्रभागातील इच्छुक येथे चाचपणी करत आहे. पण उमेदवार उपरा चालणार नाही, स्थानिकच हवा अशी येथील मतदारांची भावना असल्याने नेत्यांनी स्थानिक उमेदवार शोधण्यावर भर दिला आहे. आजच्या घडीला येथे काँग्रेसकडून सतेज पाटील समर्थक महेश कोरवी यांनी पत्नी धनश्रीसाठी उमेदवारी मागितली आहे. धनश्री या उच्चविद्याविभूषित असल्याने आणि मागील निवडणुकीत राजारामपुरी एक्स्टेन्शन प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवारासाठी माघार घेतल्याचे फळ म्हणून आता दौलतनगरात उमेदवारी द्यावी , असा त्यांचा आग्रह आहे. याशिवाय विनोद सातपुते यांनी आई, तर प्रशांत माने यांनी पत्नीसाठी तयारी सुरू केली आहे.

विद्यमान नगरसेवक : विलास वास्कर (ताराराणी )

गत निवडणुकीत मिळालेली मते

विलास वास्कर (ताराराणी) १६१५

अनिल देवेकर (काँग्रेस) ५८४

संताजी घोरपडे (अपक्ष) ४३६

प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न

प्रॉपर्टी कार्डचे रखडलेले काम हाच येथील महत्त्वाचा मुद्दा आहे. अंतर्गत रस्ते, गटारी केल्या म्हणजे विकास नव्हे, ठोस काही झालेले नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सांस्कृतिक सभागृहाचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करतात. प्रॉपर्टी कार्डची मागणी हजारात असताना ते शेकड्यात होत असल्याने बरेच जण प्रतीक्षेत आहेत.

प्रभागातील सोडवलेले नागरी प्रश्न

प्रभागात रस्ते, गटारी, वैयक्तिक, सार्वजनिक शौचालयांची कोट्यवधीची कामे झाली आहेत. रस्ते, पॅसेज काँक्रिटची कामेही झाली आहेत. ड्रेनेज पाणी काेठेही रस्त्यावर आल्याचे दिसत नाही. विरंगुळा केंद्र व छोटे सभागृहही बांधून तयार आहे.

प्रतिक्रिया

हा प्रभाग घरचा असल्याने कुटुंबाप्रमाणेच कायम काळजी घेतली. कोरोना व पूरकाळात लाेकांच्या मदतीला कायमच धावून गेलो. जीवनावश्यक कीट घरोघरी वाटले. केलेल्या विकास कामांमुळे दौलतनगरचा झोपडपट्टीचा ताेंडवळा आता अजिबात उरला नाही. प्रॉपर्टी कार्डचे कामही हाती घेतले, त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

- विलास वास्कर, विद्यमान नगरसेवक

फोटो: ०३०१२०२१-कोल-दौलतनगर

फाेटो ओळ:

दौलतनगर प्रभागात वर्षानुवर्षे रखडलेले हेच ते सांस्कृतिक सभागृह. आता त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे.