शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दुकानगाळ्यांच्या भाडे वसुलीसाठी ८ गाळे सील

By admin | Updated: February 12, 2016 00:55 IST

अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली.

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या दुकानगाळ्यांची भाडे वसुली मोहीम पालिकेने हाती घेतली असून, गुरुवारी १५ लाख रुपयांच्या भाडे वसुलीसाठी आठ गाळ्यांना सील ठोकण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस व रिपब्लिकन पक्ष यांचेही गाळे असल्याने येथील राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा झाला आहे.शहरामधील विविध परिसरांमध्ये नगरपालिकेकडून व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या व्यवसायासाठी गाळे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही आपल्या कार्यालयांसाठी गाळे भाड्याने घेतले आहेत. यापैकी काही गाळेधारकांकडे भाडे वसुलीसाठी वारंवार मागणी करूनसुद्धा भाडे किंवा त्यांचा घरफाळा नगरपालिकेकडे भरण्यात आला नाही.सध्या घरफाळा वसुलीची मोहीम गतीने सुरू असून, विविध ठिकाणच्या गाळेधारकांकडून थकीत असलेल्या भाड्याची रक्कमसुद्धा वसूल करण्याची मोहीम आता पालिकेने हाती घेतली आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली. सुरुवातीला एकूण नऊ गाळ्यांवर कारवाई करून ते सील करण्यात आहे. त्यापैकी एका गाळेधारकाने आपली रक्कम भरल्यामुळे त्याला सोडून अन्य आठ गाळे त्यांच्याकडील सुमारे १५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी सील करण्यात आले. त्यामध्ये राजाराम स्टेडियम इमारतीमधील राष्ट्रवादी कॉँग्रेसचा, तसेच रिपब्लिकन पक्षाचासुद्धा गाळा पालिका कर्मचाऱ्यांनी सील केला. (प्रतिनिधी)थकबाकी आणिदोन ‘रवी’गाळे सील करण्याच्या कारवाईमध्ये राजकीय पक्षांचे दिग्गज अडकले आहेत. त्यांच्याकडे घरफाळा, तसेच थकीत भाडे आणि डिपॉझिट यांची थकबाकी असल्याचे समजते. अशा कारवाईमध्ये दोन ‘रवीं’चा अंतर्भाव असल्याची जोरदार चर्चा आहे.