सांगली : एफआरपी न देणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांना केवळ इशारे देण्यापेक्षा त्यांची गोदामेच सील करावीत. आर्थिक नुकसानीचा गाजावाजा करणाऱ्या या कारखान्यांच्या अकौंटचीही तपासणी भारतीय प्रशासकीय सेवेतील बड्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.साखरेचे दर उतरले असले, तरी केंद्र शासनाने अनेक सवलती या कारखान्यांना दिल्या आहेत. इथेनॉलची टक्केवारी वाढविली, खरेदी कर माफ केला, मळीवरचे निर्बंध उठविले. त्यानंतर पुन्हा कारखान्यांसाठी पॅकेजही जाहीर केले. आता आणखी सरकारने काय करायला हवे? एवढे करूनही ज्या कारखान्यांना एफआरपी देणे शक्य नाही, अशा कारखान्यांची साखरेची गोदामे शासनाने सील करावीत, असेही शेट्टी म्हणाले.
साखर कारखान्यांची गोदामे सील करा : राजू शेट्टी
By admin | Updated: July 9, 2015 21:33 IST