शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नियमावलीच्या आडून दूध अनुदानाला कात्री : राज्यातील दूध संघाचे ३२५ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 01:04 IST

अतिरिक्त गाय दुधामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दूध संघांना अनुदान देण्याची घोषणा केली; पण कॅशलेस व्यवहाराची अट घातल्याने अनुदानाचे पैसेच मिळालेले नाहीत. जाचक नियमावलीच्या आडून अनुदानाला कात्री लावण्याचा उद्योग

ठळक मुद्देशासनाचे धोरण

राजाराम लोंढे।कोल्हापूर : अतिरिक्त गाय दुधामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दूध संघांना अनुदान देण्याची घोषणा केली; पण कॅशलेस व्यवहाराची अट घातल्याने अनुदानाचे पैसेच मिळालेले नाहीत. जाचक नियमावलीच्या आडून अनुदानाला कात्री लावण्याचा उद्योग सरकारने सुरू केल्याने दूध संघ चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यातील दूध संघांचे ३२५ कोटी; तर एकट्या ‘गोकुळ’चे २२ कोटी रुपये अडकले आहेत.

राज्यात गाईच्या दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात बनविली जाते; पण जूनपासून गाईचे दूध वाढले आणि त्याच कालावधीत पावडरीचे दरही घसरल्याने हा व्यवसाय अडचणीत आला. दूध संघांनी गाय दूध खरेदीदरात कपात केली, काही खासगी दूध संघांनी तर प्रतिलिटर १७ रुपये दराने दूध खरेदी करण्यास सुरुवात केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलन उभे राहिले आणि त्यातून पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये, तर पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. १ आॅगस्टपासून दूध संकलनावर हे अनुदान देण्यास सुरुवात झाली. आॅगस्टमधील दुधाला अनुदान दिले तर काही खासगी दूध संघांना आॅक्टोबरपर्यंत अनुदान मिळाले; पण त्यानंतर सरकारकडून एक रुपयाही अनुदान न मिळाल्याने संघाची आर्थिक कोंडी झाली आहे.

‘गोकुळ’चे पावडर अनुदानाचे सव्वाचार कोटी; तर दुधाचे १८ कोटी रुपये अनुदान प्रलंबित आहे. ‘वारणा’ दूध संघाचे सुमारे १० कोटी, तर राजारामबापू संघाचे आठ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत.अनुदानासाठी कॅशलेसची सक्ती आहे. ग्रामीण भागात बॅँकिंग व्यवस्था नसल्याने निम्म्याहून अधिक उत्पादकांचे व्यवहार कॅशलेस नाहीत; त्यामुळे संपूर्ण अनुदानच रोखून धरले आहे. जेवढ्या उत्पादकांची बिले बॅँकेत जमा होतात, त्याच दुधापोटी अनुदान देण्याची शासकीय यंत्रणेची तयारी आहे. त्यातही अनेक त्रुटी काढल्या जात असल्याने संघापुढे पेच निर्माण झाला आहे.

उत्पादकांची बिले बॅँकेत जमा केली तरी कोणत्याही प्रकारच्या कपाती करायच्या नाहीत, असा फतवा काढला आहे. उत्पादकांच्या बिलातून पशुखाद्य, दूध अ‍ॅडव्हान्ससह इतर कपाती केल्या जातात. या कपाती करून रोख निघणारी रक्कम बॅँकेत जमा करावी लागते. काही उत्पादकांना कपाती वजा जाता एक रुपयाही रोखीने निघतो; त्यामुळे संबंधित उत्पादकाचे पैसे जमा करण्याचा प्रश्नच येत नाही. जाचक नियमावलीच्या आडून शासन दूध अनुदानाला कात्री लावत आहे.अध्यादेशाबाहेरील नियमावली!अनुदानाच्या अध्यादेशात केवळ कॅशलेस व्यवहाराची अट होती; पण उत्पादकांच्या दूध बिलातून कपातीच करायच्या नाहीत, हा नवीन नियम घुसडून शासकीय यंत्रणा दूध संघांना वेठीस धरत असल्याचे आरोप होत आहे.उत्पादक-संस्थाचालकांत खडाजंगीसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा डोलारा दूध व्यवसायावर विसंबून असल्याने त्याला कधी पैशाची गरज भासेल हे सांगता येत नाही. कॅशलेसमुळे त्याची अडचण झाली असून २०-३० रुपयांसाठी दिवसभर बॅँकेच्या रांगेत तिष्ठत बसावे लागत असल्याने उत्पादक व संस्थाचालकांत खडाजंगी उडत आहे.एप्रिलपर्यंतच अनुदानआॅगस्टपासून दूध अनुदान सुरू झाले आहे. मध्यंतरी ३१ जानेवारीला अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा मागणी झाल्यानंतर एप्रिलपर्यंत त्याला मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाgovernment schemeसरकारी योजना