शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊट गाईडमध्ये सलग आठ वर्षे प्रथम

By admin | Updated: February 9, 2015 00:39 IST

निमशिरगाव विद्यामंदिरची गरुडभरारी : विद्यार्थ्यांकडून नेत्रदीपक संचलन

जयसिंगपूर : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सलग आठ वर्षे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड स्पर्धेत निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. चारित्र्य, हस्तव्यवसाय, आरोग्य व सेवा या चार मूलभूत याच्या आधारे विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. विश्वबंधुत्वाची भावना, प्रखर राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, सेवावृत्ती, राष्ट्रीय एकात्मता व साहसी वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार व दिशा देण्यासाठी स्काऊट गाईड ही चळवळ सुरू झाली आहे. सुजाण नागरिक घडविण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी मूल्य शिक्षणावर आधारित असलेल्या स्काऊट गाईडच्या माध्यमातून निमशिरगावमधील कुमार विद्यामंदिरचे विद्यार्थी आपल्यातील कौशल्य दाखवित आहेत. संचलन स्पर्धेमध्ये सलग आठ वर्षे या शाळेतील विद्यार्थी सर्वोत्तम ठरले आहेत. स्काऊट गाईडअंतर्गत शाळेमध्ये ध्वजारोहण करण्याचीही परंपरा आहे. मूल्य शिक्षणावर आधारित बोधकथा, पर्यावरण याबाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. ध्वजबांधणीसाठीही विद्यार्थी तयार झाले आहेत. संचलन, झांजपथक, लेझीम, घरामधील स्वच्छतेपासून वैयक्तिक नीटनेटकेपणा, स्वत:चे साहित्य कसे हाताळावे, समाजामध्ये सत्कार्य करण्याची भावना या माध्यमातून आपले कौशल्य विद्यार्थ्यांनी अंगिकारले आहे. या सर्व उपक्रमाचा शाळेमध्ये दैनंदिन आढावा घेतला जातो. गावाच्या यात्रेत स्काऊट गाईडचे विद्यार्थी संचलनातून आपल्या शिस्तीचे दर्शन घडवितात. अत्यंत नीटनेटकेपणाने या विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांच्या या सर्व यशात शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय समूहनृत्य, तंबू सजावट, झांजपथक, लेझीम, समूहगीत या स्पर्धांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सुभाष चव्हाण हे स्काऊट मास्टर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.