शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसचिवपदाच्या कार्यभाराचा पेच

By admin | Updated: May 26, 2016 00:19 IST

आज स्थायी सभा : उमेश रणदिवे रजेवर; इतर अधिकाऱ्यांचा कार्यभारास नकार

कोल्हापूर : महानगरपालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे अचानक रजा काढून गेल्यामुळे त्यांच्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार स्वीकारण्यास कोणी अधिकारी तयार झालेला नाही. बुधवारी दिवसभर या पदाचा कार्यभार सांभाळील अशा सक्षम अधिकाऱ्याचा शोध सुरू होता; पण सायंकाळपर्यंत त्यात अधिकाऱ्यांना अपयश आले. दरम्यान, आज, गुरुवारी सकाळी स्थायी समितीची सभा होत आहे. महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षातून नगरसचिव उमेश रणदिवे यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव येत असल्याने त्यांनी आपल्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार काढून घ्यावा, अशी विनंती आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे; पण आयुक्तांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. सध्या ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून सुनील कदम यांना घेण्याच्या ठरावावरून सभागृहातील सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे रणदिवे यांच्यावरील हा दबाव अधिकच वाढला आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारपासून अचानक रजा काढली असून सोमवार (दि. ३०) पासून ते दीर्घ मुदतीच्या रजेवर जाण्याचा विचार करीत आहेत.आज, गुरुवारी स्थायी समितीची सभा होत आहे. त्यामुळे नगरसचिवपदाचा कार्यभार तात्पुरता कोणाकडे तरी सोपवावा लागणार आहे. त्यामुळे उपायुक्त विजय खोराटे सकाळपासून सक्षम अधिकाऱ्याच्या शोधात होते. त्यांनी दोन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली; पण त्यांनी हा पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून तो मंजूर करण्याच्या हालचाली पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत. या ठरावाद्वारे राज्य सरकारकडे त्यांच्या बदलीची मागणी करण्यात येणार आहे. १६ एप्रिलला झालेल्या सभेत हा ठराव करण्यात यावा, असा आग्रह नगरसेवकांना धरला, परंतु असा ठराव आयत्या वेळी घेता येत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने तो मागे ठेवण्यात आला होता. आयुक्त पी. शिवशंकर नगरसेवकांची कायदेशीर कामे करत नाहीत, नगरसेवकांचा सन्मान राखत नाहीत, त्यांचा प्रशासनावर वचक नाही, एखाद्या फाईलवर निर्णय घ्यायला जाणीवपूर्वक विलंब लावतात, असे आक्षेप त्यांच्या कामकाजावर घेण्यात आले आहेत. १६ एप्रिलला कारभारी नगरसेवकांनी पुढाकार घेत तातडीने ७२ नगरसेवकांच्या सह्या घेऊन आयुक्तांवर अविश्वास दाखवून बदलीचा ठराव करावा, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांच्याकडे करण्यात आली होती; परंतु आयुक्तांच्या बदलीचा ठराव असा अचानक सभेत चर्चेला घेत येणार नाही. तो विषय अजेंड्यावर घ्यावा लागेल, असे स्पष्टीकरण देण्यात आल्यामुळे हा ठराव मागे ठेवण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा हा बदलीचा ठराव करण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. त्यास काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे; पण भाजप-ताराराणी आघाडी त्याला विरोध करण्याची शक्यता आहे.