कोल्हापूर : वैयक्तिक निकालाची वाढलेली टक्केवारी आणि विज्ञान, वाणिज्य शाखांकडील विद्यार्थ्यांचा कल कायम राहिल्याने यावर्षी अकरावी प्रवेशाचा ‘कटआॅफ’ वाढला आहे. यंदा विज्ञानचा कटआॅफ तीन टक्क्यांनी, तर वाणिज्यचा तीन ते नऊ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अंतिम निवड यादी समितीने शुक्रवारी जाहीर केली. प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया आज, शनिवारपासून सुरू होणार आहे. निवडयादी व पुढील प्रवेश प्रक्रियेची माहिती शुक्रवारी प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी आणि कार्याध्यक्ष डॉ. व्ही. बी. हेळवी येथे पत्रकार परिषदेत दिली. गोंधळी म्हणाले, शहरातील ३२ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया १६ जूनपासून सुरू झाली. यानंतर २३ ते ३० जून दरम्यान अर्जांची छाननी करून निवड यादी तयार केली आहे. यात विज्ञान शाखेसाठी ७०१२, वाणिज्य शाखा (मराठी) २९८७, (इंग्रजी) १२५०, तर कला शाखा (मराठी) १९९८ व (इंग्रजी) २७ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. यात प्रवेश क्षमतेपेक्षा विज्ञान शाखेसाठी १८९८ तर, वाणिज्य शाखेसाठी २८० अर्ज अधिक आले आहेत. त्यावर महाविद्यालयांना विज्ञान, वाणिज्य शाखांच्या जागा वाढवून दिल्या आहेत. उपलब्ध क्षमतेपेक्षा १८१५ अर्ज कमी दाखल झाल्याने कला शाखेचा कटआॅफ आठ ते दहा टक्क्यांनी घटला आहे.डॉ. हेळवी म्हणाले, एकूण उपलब्ध १३४०० जागांसाठी १३२७४ अर्जांची निवड झाली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी आज, शनिवारी, सोमवारी (दि. ४) व मंगळवारी (दि. ५) आणि गुरुवारी (दि. ७) कार्यालयीन वेळेत मूळ कागदपत्रांसह त्यांची निवड झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावयाचा आहे. यावेळी समितीचे सचिव टी. एल. मोळे, आर. ए. हिरगुडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) विवेकानंद, न्यू कॉलेजची आघाडीगेल्या वर्षी प्रवेशाच्या टक्केवारीच्या कटआॅफमध्ये न्यू कॉलेज आघाडीवर होते, तर विवेकानंद कॉलेज एक टक्क्याने मागे होते. यावर्षी विज्ञान शाखेच्या ९१.८० टक्के या कटआॅफवर विवेकानंद आणि न्यू कॉलेज हे अव्वलस्थानी आहेत. वाणिज्य व कलाशाखेमध्येही त्यांनी बाजी मारली आहे.निवड यादी पाहण्यास पावसातही गर्दीकोल्हापूर : भरपावसातही शहरातील विविध महाविद्यालयांत अकरावीची निवड यादी पाहण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने मंगळवारी दुपारी तीन वाजता निवड यादी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचनाफलकांवर तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या ६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. आपण दिलेल्या पसंतीक्रमानुसार आपल्याला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार, हे पाहण्यासाठी संबंधित महाविद्यालयांमध्ये यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. काहीजण आपल्या मित्रमैत्रिणींना निवड यादीची माहिती मोबाईलवरून देत होते. गुणवता यादीची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीद्वारे ‘ङ्म’ँंस्र४१ 11३ँ अे्रि२२्रङ्मल्ल या मोबाईल अॅपवर उपलब्ध करून दिली होती. काही त्यावरच आपल्याला मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)शाखानिहाय ‘कट आॅफ लिस्ट’ महाविद्यालयविज्ञानवाणिज्यकला विवेकानंद महाविद्यालय९१.८०७९.६०४७.६० न्यू कॉलेज९१.८०८१.८०७१.४०राजाराम कॉलेज९१.४०-५७.२० गोखले कॉलेज८४. २०६३.२०३५.८० कमला कॉलेज८७.४०७७.६०४९.४० एस. एम. लोहिया ज्यु. कॉलेज८९.८०७३. ८०६२.६०कॉमर्स कॉलेज-७६.८०-शहाजी कॉलेज-६७.२०३५.०८महावीर कॉलेज७७.००६५.८०३५.०० महाराष्ट्र हायस्कूल व ज्यु. कॉलेज८८.४०७४.८०६१.६० मेन राजाराम हायस्कूल व ज्यु. कॉलेज८६.८०७४.४०५४.८० राजर्षी छत्रपती शाहू महाराज ८३.८०-५३.८० हायस्कूल व ज्यु. कॉलेजराजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी८१.४०६२.८०३८.०० विद्यापीठ ज्युनिअर कॉलेज८३.८०७०.००३८.००प्रिन्सेस पद्माराजे ज्यु. कॉलेज फॉर गर्ल्स८५.८०७१.८०३७.२०‘आयटीआय’साठी ४०८ प्रवेश अर्जांची निश्चितीकोल्हापूर : कोल्हापुरातील ‘आयटीआय’कडील अर्जनिश्चितीचा वेग वाढला आहे. याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ४०८ अर्ज, तर शासकीय व खासगी तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ८५४ अर्जांची निश्चिती झाली आहे. गेले काही दिवस सर्व्हर व्यवस्थित कार्यरत न झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्चितीकरिता अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, हा सर्व्हर गेले दोन दिवस पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. त्यामुळे शुक्रवारअखेर ४०८ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज निश्चित झाले.
विज्ञान, वाणिज्यचा ‘कटआॅफ’ वाढला
By admin | Updated: July 2, 2016 00:37 IST