शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: February 28, 2015 00:48 IST

चारचाकी वाहनामधून आले होते अपहरणकर्ते

कोल्हापूर : जवाहरनगर येथील रेहान सादिक पटवेगार (वय १०) या शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न शुक्रवारी रात्री महापालिका परिसरात फसला. प्रसंगावधान राखून हाताला हिसडा मारून रेहान पळून जाण्यात यशस्वी ठरला. चारचाकी वाहनातून चार संशयित अपहरणकर्ते तोंडाला रूमाल बांधून आले होते. घटनेनंतर पटवेगार कुटुंबीयांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस याबाबत माहिती घेत होते. दरम्यान, गत आठवड्यात टाऊन हॉल बागेजवळून दोन वर्षांच्या फरहान उर्फ आय्यान जांभारकर या बालकाचे अपहरण झाले आहे. तो अद्याप सापडलेला नाही. याबाबत पटवेगार कुटुंबीयांनी सांगितले की, जवाहरनगर येथील रेहान सादिक पटवेगार हा रोज लक्ष्मीपुरी स्वयंभू गणेश मंदिर परिसरात शिकवणीला येतो. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे सायंकाळी शिकवणीला आला. शिकवणीनंतर तो वडिलांच्या शिवाजी मार्केटमधील दुकानाकडे निघाला. त्यावेळी महापालिका येथील भाऊसिंगजी रोडवर सोमवार पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चारचाकी व्हॅन थांबली होती. गाडीमध्ये चौघेजण रूमाल बांधून बसले होते. त्यातील दोघेजण रूमाल बांधून बाहेर आले. अपहरणकर्त्यांनी रेहानला रस्त्यावर अडवून शीतपेय दिले. मात्र त्याने शीतपेय घेतले नाही. तो शीतपेय घेत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याला जबरदस्तीने दोघे अपहरणकर्ते गाडीत घालू लागले. त्यांना चकवा देऊन महापालिकेमार्गे तो पसार झाला. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, रेहान पटवेगार मिळून आला नाही. याचसुमारास तो एका गाडीच्या बाजूला रडत बसला. थोड्या वेळाने तो वडिलांकडे गेला व घडल्या प्रकाराची माहिती दिली. सादिक हे त्याला घरी घेऊन आले. त्यांनी हा प्रकार कुटुंबीयांना व मित्रमंडळींना सांगितला. त्यानंतर रेहान, त्याचे वडिल सादिक व आजोबा व मित्रपरिवारासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात रात्री आले. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाल यांना सांगितला. रेहानकडून याची पोलिसांनी माहिती घेतली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गस्त घालण्याच्या सूचना पांचाल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या. चार दिवसांपासून पाळत... रेहान पटवेगार हा ताराबाई पार्क येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो. चार दिवसांपूर्वी अपहरणकर्त्यांपैकी एकजण पाळत ठेवून शाळेच्या आवारात थांबून होता, असे पोलिसांना त्याने सांगितले. आजोबा झाले भावनावश... रेहान पटवेगार यांचे आजोबांनी पोलीस उपनिरीक्षक पांचाल यांना कोल्हापुरात असे दिवसेंदिवस प्रकार वाढत आहे. याची गंभीर दखल घ्या. आमचा नातू आम्हाला सुखरूप पोहोचला,असे भावनावश होत त्यांनी सांगितले.