कोल्हापूर : येथील सारस्वत बोर्डिंगच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या केशव तिरोडकर यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले.
वसतिगृह अध्यक्ष मोहन देशपांडे यांनी संस्था कामकाजाचा आढावा घेतला. उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर यांनी शिष्यवृत्ती उपक्रमाची माहिती दिली. गेली २५ वर्षे हा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहसचिव सुमंगला पै यांनी तिरोडकर यांचा परिचय करून दिला. यावेळी माजी अध्यक्षा डॉ. यशस्विनी जनवाडकर यांच्या हस्ते तिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रजनीकांत जनवाडकर ट्रस्ट आणि शोभा शानभाग यांच्याकडूनही रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष संजीव बोरकर, मानद सचिव सुधीर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वस्त अमित सलगर यांनी सूत्रसंचालन केले.
१३१२२०२० कोल सारस्वत बोर्डिंग
येथील सारस्वत बोर्डिंगच्या वतीने सौम्या तिरोडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. यावेळी मोहन देशपांडे, सुधीर कुलकर्णी, संजीव बोरकर उपस्थित होते.