शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींसाठी ‘कन्यादान साडी’

By admin | Updated: March 25, 2015 00:48 IST

मुलींचा जन्मदर वाढीसाठी प्रयत्न : पोर्ले येथील उदय समूहाकडून आगळावेगळा उपक्रम

सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे -पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील उदय समूहाने लग्नाच्या बोहल्यावर चढणाऱ्या मुलीला ‘कन्यादान साडी’च्या माध्यमातून माहेरचा आहेर देण्याचा उपक्रम या वर्षीपासून सुरू केला आहे. समाजाच्या ऋणातून थोडेफार का होईना उतराई म्हणून हा उपक्रम समूहापुरता मर्यादित न ठेवता गावातील प्रत्येक लेकींसाठी तो राबविला जाणार आहे.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या भारत सरकारच्या उपक्रमातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये गावाकडील स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा मागे नाहीत. काही संस्थांनी सभासदांच्या कुटुंबात मुलगी जन्मली, तर तिच्या नावे ठेव पावत्या ठेवण्याची योजना राबविली आहे. याच धर्तीवर हा उपक्रम सुरू केला आहे.घराण्याचा वंश म्हणून मुलग्याकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक दांपत्याला मुलगीपेक्षा मुलगाच हवा असतो. या भावनेमुळे देशात दर हजारी मुलींचे प्रमाण घटत आहे. याचे गांभीर्य ओळखून मुलींचा जन्मदरवाढीसाठी पोर्ले येथील उदय समूहाच्या वार्षिक सभेत अंगद चौगुले या कार्यकर्त्याने समूहाच्यावतीने मुलींसाठी ‘कन्यादान साडी’ देण्याचा उपक्रम राबवावा, अशी मागणी केली. या मागणीला सर्वांनीच मंजुरी दिली. परंतु, हा उपक्रम समूहापुरता मर्यादित न ठेवता गटनेते परशराम खुडे यांनी हा उपक्रम गावातील प्रत्येक मुलीसाठी राबविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत गावातील दहा-बारा मुलींना दीड हजार किमतीची ‘कन्यादान साडी’आहेर म्हणून दिली आहे. यासाठी समूहातील काही हौशी कार्यकर्ते स्वखुशीने रक्कम जमा करतात. तालुक्यातून असा आगळावेगळा उपक्रम राबवून ‘लेक वाचवा’ या उपक्रमाला हातभार लावल्याने मुलीच्या आई-वडिलांकडून व तालुक्यातून उदय समूहाच्या या उपक्रमाबद्दल ऋणात्मक कौतुक होत आहे.गावात सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी सूचविलेल्या उपक्रमाला साथ दिली. गावातील गटातटाचा विचार न करता माझ्या संस्थेचा सभासद गावाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला आहे. त्यामुळे हा उपक्रम न ठेवता सर्वांसाठी खुला ठेवला आहे. - परशराम खुडे, गटनेते