शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विजयी हवा टिकवण्याचे ‘पी. एन.’ यांना आव्हान

By admin | Updated: June 11, 2014 01:21 IST

नरके, पाटील, सूर्यवंशी यांचा संपर्कावर भर : ‘कुंभी’, संपर्क हेच प्रचाराचे मुद्दे राहणार

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या करवीर मतदारसंघात दोन्ही काँग्रेस एकजुटीने लढले तर काय होऊ शकते, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीतील हे विजयी वातावरण विधानसभेतही परावर्तित करण्याचे आव्हान कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासमोर आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत असणारे सर्व घटक ‘पी. एन.’ यांच्याबरोबर राहणार का? हाच या लढतीतील विजय ठरवणारा मुद्दा आहे. पुनर्रचनेनंतर जुन्या सांगरुळ व करवीरमधील तीन-तीन जिल्हा परिषदेचे मतदारसंघ, पन्हाळ्यातील कळे व यवलूज, तर संपूर्ण गगनबावडा तालुका, अशी या मतदारसंघाची व्याप्ती आहे. ‘कुंभी’, ‘भोगावती’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’ व ‘राजाराम’ या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र या मतदारसंघात येते. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे पी. एन. पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व ‘शेकाप’चे संपतराव पवार हे रिंगणात होते, पण खरी लढत पाटील व नरके यांच्यात झाली. पाटील यांनी पाच वर्षांत आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या बळावर जोरदार प्रयत्न केले. त्यांना जुना सांगरुळ व करवीर वगळता पन्हाळा व गगनबावडा तालुका नवीनच होता. संपूर्ण मतदारसंघच ‘कुंभी’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो व तीन वर्षे ठेवलेला संपर्क याचा थेट फायदा चंद्रदीप नरके यांना झाला. अत्यंत काटाजोड झालेल्या लढतीत चंद्रदीप नरके यांनी ५ हजार ८१३ मतांनी विजय मिळवला. जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार रिंगणात राहिला नाही, ही गोष्ट नरके यांच्या विजयात महत्त्वाची ठरली. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पाटील यांनी पराभवानंतरही ‘गोकुळ’, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून मतदारसंघात कायम संपर्क राखला आहे, पण एकूण देशात व राज्यात कॉँग्रेसबद्दलच्या नाराजीचा त्यांना त्रास होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिक यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्यावेळी फटका बसलेल्या जुन्या करवीर व पन्हाळ्यात त्यांनी चांगल्या प्रकारे पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मतदारसंघ शहराच्या लगतचा असल्याने येथे शहरातील लाट थडकतेच. त्यामुळे महायुतीचे वारे व आमदार नरके यांची संपर्क मोहीम त्यांना रोखावी लागेल. विरोधी आमदार असतानाही नरके यांनी मतदारसंघात चांगली विकासकामे केली आहेत. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. लोकसभेला त्यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारयंत्रणा राबवली. परंतु, मताधिक्य मिळवून देण्यात ते मागे राहिले. दहा हजार मतांनी आपण मागे राहू, असे वाटत असताना हे मताधिक्य ३४ हजारापर्यंत गेले. त्यांच्यादृष्टीने हा धक्का आहे. लोकसभेला बाजूला गेलेले ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके विधानसभेला त्यांच्याबरोबर असतील. गेल्यावेळी नरके गगनबावड्यातून ३३४२ मतांनी मागे होते. आता त्यांनी स्वतंत्र गट निर्माण करत परिस्थिती सुधारली आहे, पण भोगावती खोऱ्यात अजूनही ते कमकुवत आहेत. संपतराव पवार हे रिंंगणातून बाजूला गेल्याने ‘शेकाप’तर्फे येथून कोण, याची चर्चा सुरू आहे. ‘शेकाप’चे पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी संपर्क मोहीम राबविली आहे. पक्षाकडून विचार झाला तर ठीक, अन्यथा रिंंगणात उतरायचेच, या ईर्ष्येने ते कामाला लागले आहेत. जनसुराज्य पक्षाने निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी उमेदवार निश्चित नाही. बाजार समितीचे माजी उपसभापती नामदेव पाटील (कुडित्रेकर) हे इच्छुक आहेत. ऐनवेळी वेगळाच चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. ‘शेकाप’ व जनसुराज्य यांच्या आघाडीतर्फे राजेंद्र सूर्यवंशी लढण्यास इच्छुक आहेत. जुना करवीर व गगनबावडा तालुक्यांत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. त्यांची मदत पी. एन. पाटील यांना महत्त्वाची ठरु शकते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे व जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे हे राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार थेट ‘शिवसेने’च्या छावणीत गेल्याने आमदार नरके यांना त्याचा फायदा झाला. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळावाच लागणार आहे. पण ‘भोगावती’ शिक्षण मंडळाच्या निवडणुकीमुळे वातावरण पुन्हा दूषित झाले आहे. ते सुधारण्याचे काम पाटील यांना करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील मताधिक्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीतील सर्व घटक त्यांच्याबरोबर राहिल्यास विजय अवघड नाही. परंतु, आजपर्यंत छुपी काँग्रेसच पराभव करते असा त्यांचा अनुभव आहे. ती परंपरा खंडित करण्याचे पी.एन.पाटील यांचे प्रयत्न राहतील. सत्तारुढ सरकारबद्धल जनमाणसांत असलेली नाराजी ही आमदार नरके यांच्यादृष्टीने महत्त्वाची जमेची बाजू आहे. (उद्याच्या अंकात कागल मतदारसंघ)