यावेळी निवास साळोखे यांनी या चौकातून सुरू झालेला लढा यशस्वीच होतो. हे दोन्ही स्टुडिओ वाचविण्यासाठी सर्वपक्षीय मंडळी, सामाजिक संघटना, तालीम मंडळे, कलाकार-तंत्रज्ञ यांची व्यापक बैठक घेऊन आंदोलनाचे नियोजन करा. आपण त्यांना हिसका दाखवून हा लढा यशस्वी करून दाखवू. बाबा पार्टे यांनी बिल्डरने सामंजस्याने ऐकले नाही तर आमच्या आंदोलनाच्या फलकावर असलेल्या कोल्हापुरीने हिसका दाखवू, पण दोन्ही स्टुडिओ वाचवू, असे सांगितले.
यावेळी चित्रपट मडामंडळाचे सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, राहुल राजशेखर, अर्जुन नलवडे, इम्जियात बारगीर, सुरेंद्र पन्हाळकर, अनिल चोपदार, मिलिंद अष्टेकर, सतीश बीडकर, महेश पन्हाळकर, आकाराम पाटील, संग्राम भालकर, मंगेश मंगेशकर, प्राण चौगुले, शुभांगी साळोखे, सीमा कांबळे उपस्थित होते.
---
फोटो नं १६०८२०२१-कोल-स्टुडिओ फलक
ओळ : कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे शालिनी व जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाचे फलक उभारण्यात आले आहे.
----