शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नदी वाचवा छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 15:39 IST

कोल्हापूर 16 : येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात आठव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या नदी वाचवा-जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन रविवारपर्र्यत खुले आहे.या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महोत्सवाचे संचालक ...

कोल्हापूर 16 : येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात आठव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या नदी वाचवा-जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन रविवारपर्र्यत खुले आहे.

या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महोत्सवाचे संचालक विरेंद्र चित्राव, चंद्रहास रानडे, कृष्णा गावडे, प्राचार्य महादेव नरके, विजय टिपुगडे, अनिल चौगुले, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

या छायाचित्र प्रदर्शनाला कसबा बावडा येथील जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयाच्या ३१0 विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक उपस्थित होते. नदी वाचवा-जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित या छायाचित्र प्रदर्शनात राज्यभरातील ८० छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे.

यानिमित्ताने घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून कोल्हापूरातील लोकमतचे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ, नाशिकचे किरण तांबट, गडहिंग्लजचे अशपाक किल्लेदार दीपक कुंभार, वैभव भाले, अवधूत गायकवाड यांच्या छायाचित्रांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.