शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्ट वाचवू

By admin | Updated: March 19, 2016 00:23 IST

अश्विनी रामाणे : कपिलतीर्थ मार्केटमधील बॅडमिंटन कोर्ट बचाव समितीचे निवेदन

कोल्हापूर : कपिलतीर्थ मार्केट येथील ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्ट वाचवू, असे आश्वासन महापौर अश्विनी रामाणे यांनी शुक्रवारी दिले. महानगरपालिकेने बॅडमिंटन कोर्टाबाबतचा प्रस्ताव फेटाळावा, अशी मागणी ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्ट बचाव समिती व विविध राजकीय, सामाजिक तथा क्रीडापे्रमी यांच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाने महापौर रामाणे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.कपिलतीर्थ मार्केट येथील ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्टवर घाला घालण्याचा प्रयत्न काही अप्प्रवृत्ती करीत आहेत. या बॅडमिंटन कोर्टची स्थापना २९ जून १९६६ ची आहे. कोल्हापुरातील हे पहिले वुडन कोर्ट असून १९७३ ला या कोर्टवर अखिल भारतीय चॅम्पियनशिप स्पर्धा झाली होती. या कोर्टवर प्रसिद्ध राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण, संजय शर्मा, किरण कौशिक यांसारखे दिग्गज खेळाडू खेळले आहेत. सध्या येथे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होत असते.आज या कोर्टवर रोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थानिक दोनशे विद्यार्थी एकूण ११ बॅचमध्ये सराव करीत असतात. अशा उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे राजर्षी शाहूंच्या विचारांचा अनादर करणे होईल. शहराच्या मध्यवस्तीत अशा कोर्टची नागरिकांना नितांत गरज आहे. त्यामुळे नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकारी यांनी हा प्रस्ताव फेटाळून ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्टचा बचाव करावा, असे निवेदनात म्हटले आहे.शिष्टमंडळात महेश उरसाल, संभाजी साळुंखे, सुनील पाटील, प्रकाश सरनाईक, प्रसाद जाधव, प्रमोद सावंत, आकाश नवरुखे, केदार नाडगोंडे, सुधीर सूर्यवंशी, गौतम तपकिरे, राहुल महाजन, मोहन नार्वेकर, सुनील खोतलांडे, मंदार पाटील, केदार हसबनीस, निवास राऊत, निनाद कामत, सुनील राजवाडे, विनिता आंबेकर, राहुल पाटील, आदींचा सहभाग होता. ( प्रतिनिधी)