शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डीतील प्रांजलला मिळाली मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:01 IST

राजाराम कांबळे। लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गावात दुसरी मुलगी ...

राजाराम कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गावात दुसरी मुलगी झाली म्हणून प्रकाश पाडावे व जयश्री पाडावे या निर्दयी माता-पित्याने आपल्या पोटच्या गोळ्याला थिमेट पाजून ठार मारले. मात्र, त्यांची पहिली मुलगी आई-वडिलाविना पोरकी झाली. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत ओम साईराम सेवा ट्रस्ट, नवी मुंबईच्या अध्यक्षा नीता कृष्णा खोत यांनी सामाजिक बांधीलकी मानून नकुशीपायी पोरक्या झालेल्या प्रांजल हिला मायेची ऊब देऊन तिच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. त्यामुळे समाजात आजदेखील माणुसकी शिल्लक आहे, याची या घटनेने प्रचिती आली.शासन ‘लेक वाचवा अभियान’ राबविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. ‘लेक वाचवा अभियान’ ग्रामीण व शहरी भागात रुजविण्यासाठी शासनस्तरावर अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र, या सर्वाला छेद देणारी घटना शाहूवाडी तालुक्यात सावर्डी गावात घडली. प्रकाश व जयश्री पाडवे यांना पहिली प्रांजल नावाची मुलगी आहे. दुसरी मुलगी झाली म्हणून या दोन निर्दयी माता-पित्याने मुलीला विषारी औषध पाजून ठार मारले.माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यामुळे संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली. मात्र, प्रकाश व जयश्री पाडवे यांची पहिली मुलगी पोरकी झाली. प्रांजल हिचे आजोबा बंडू पाडावे यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. गुºहाळघरावर कामाला जाऊन कुटुंबांचा उदरनिर्वाह केला जातो.हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या नीता खोत यांनी पोरक्या झालेल्या प्रांजलचे संगोपन, तसेच शालेय शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.ट्रस्टने कुटुंबाची जबाबदारी घेतलीनीता खोत यांनी सावर्डी गावात जाऊन प्रांजलेचे आजोबा बंडू पाडावे, आजी आकुबाई पाडावे यांची भेट घेतली. प्रांजलची व त्या कुटुंबाला लागणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली. प्रांजल सज्ञान होईपर्यंत संपूर्ण खर्च ओम साईराम सेवा ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टने संसारोपयोगी साहित्य, मुलीला कपडे, मुलीच्या आजीला साडी, खाऊ, गहू, तांदूळ, साखर, तेल, आदी साहित्य दिले. या कुटुंबाला महिन्याला लागणारा खर्च ट्रस्ट करणार आहे.