शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुख्यमंत्र्यांचा निरोप सावकरांना

By admin | Updated: December 15, 2015 01:10 IST

पालकमंत्री बनले दूत : महाडिक यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न

कोल्हापूर : सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सकाळी वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांची वारणानगर येथे जाऊन भेट घेतली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप दिला. पालकमंत्र्यांनी मात्र नंतर ही भेट खासगी होती, असे पत्रकारांना सांगून घुमजाव केले आहे.फडणवीस व कोरे यांचेही जुने संबंध आहेत. त्यातच भाजप सरकारकडून वारणा दूध संघालाही आर्थिक मदत झाली आहे. केंद्रातील जसे भाजप सरकार राज्यसभेत अल्पमतात आहे, तसेच राज्य विधानपरिषदेतही भाजप अल्पमतात आहे. त्यामुळे विधानसभेत मंजूर झालेले विधेयक विधानपरिषदेत मंजूर होताना दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात किंवा वारंवार वटहुकूम काढावा लागतो. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपने केले आहे. त्याचाच भाग म्हणून पालकमंत्र्यांनी विनय कोरे यांची भेट घेऊन आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करण्याची विनंती केली. कोरे यांनी त्यांना ठोस आश्वासन न देता दोन दिवसांत सांगू, असे सांगितले आहे.खासदार महाडिक : प्रा. पाटील यांची भेटदरम्यान, सोमवारी दुपारी खासदार धनंजय महाडिक व संजय डी. पाटील यांनीही जनसुराज्यचे नेते प्रा. जयंत पाटील यांची भेट घेतली. आपण एकत्र राहूया, असा आग्रह महाडिक यांनी प्रा. पाटील यांच्याकडे धरला. संजय पाटील यांनीही सहकार्याबाबत जयंत पाटील यांना विनंती केली.विधानसभेच्या ‘आॅफर’ची कागलात चर्चारविवारी आमदार महाडिक यांनी मुरगूडला जाऊन मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली; परंतु तिथे त्यांनी संजय मंडलिक यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू, अशी आॅफर दिली. त्याची जोरदार चर्चा तालुक्यात सोमवारी दिवसभर होती. मंडलिक गटाच्या नगरसेवकांनी महाडिक यांना तुम्ही लोकसभेला मंडलिक यांना पाठिंबा द्या, आम्ही आता सगळी मते तुम्हांला देतो, अशी मागणी केली. त्यावर मात्र महाडिक चांगलेच निरुत्तर झाले. ते माझ्या हातात नाही, त्याचे मला काही सांगता येणार नाही. विधानसभेला मी तुम्हाला मदत करतो, असे सांगण्याचा प्रयत्न महाडिक यांनी केला.