कोरोना माहामारीमुळे दोन वर्षे सर्वच धबधब्यांकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तसेच सर्वच धबधब्यांवर गर्दी करण्यास प्रशासनाने बंदी घातली असल्यामुळे पर्यावरणप्रेमींना निसर्गाचा आनंद घेता येत नाही. कोसळणारे सर्वचे धबधबे ही मुख्य रस्त्यावरून आत आहेत. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या आनंदापासून वंचित राहावे लागते. मात्र सोळांकूर-गैबी घाटामधील धबधबा हा राज्यमार्गावरील प्रवाशांना पर्वणीच ठरत आहे. या घाटात अनेक छोटे-मोठे धबधबेही कोसळत आहेत. मात्र, महामार्गावरील हा मोठा धबधबा असल्याने जाणारे येणारे पर्यटक थांबून आल्हाददायक वातावरणाचा व धबधब्यांच्या आनंद घेत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फोटोसेशन्स करताना दिसत आहेत. परिसरातील पर्यटकही येथे येऊन आनंद घेत आहेत. या धबधब्यांवर पर्यटकांना आणखीन आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रमही राबविण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.
१९ सोळांकूर धबधबा