शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

शनिवार पेठेत साडेसात तोळे दागिन्यांवर डल्ला

By admin | Updated: November 14, 2015 01:15 IST

शहर उपअधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील घटना

कोल्हापूर : शनिवार पेठ येथे देवघरात लक्ष्मीपूजन केलेल्या सुमारे साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना शहर उपअधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील गजबजलेल्या मध्यवस्तीत गुरुवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी जयसिंग पाटील यांचे जय भवानी चौक, शनिवार पेठ येथे घर आहे. दिवाळीनिमित्त बुधवारी रात्री देवघरात लक्ष्मीपूजन केले होते. यावेळी लक्ष्मीच्या फोटोस नेकलेस, गंठण व दोन अंगठ्या घातल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याने त्यांनी पूजा उतरली नाही. दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास देवघरात गेल्यानंतर दागिने गायब असल्याचे दिसले. दागिने गायब झाल्याचे समजताच पाटील यांनी घरातील लोकांना या प्रकाराची माहिती दिली. दुमजली घरात दिवाळीनिमित्त लोक घरीच होते. त्यामुळे नेमके दागिने कोणी चोरले याबाबत सर्वजण गोंधळून गेले. पाटील यांनी जिन्यातून चोरट्याने देवघरात प्रवेश करून दागिने चोरल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे करीत आहेत. (प्रतिनिधी)