शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्शग्राम’ निवडीसाठी शनिवारची डेडलाईन

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

प्रत्येक आमदार घेणार तीन गावे दत्तक : पायाभूत सुविधा, खेडेगावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी योजना

प्रकाश पाटील -- कोपार्डे--राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या गावाची निवड करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व आमदारांना आॅक्टोबरअखेर अंतिम मुदत दिली आहे. या योजनेसाठी विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांना प्रत्येकी तीन गावे दत्तक घ्यावी लागणार आहेत. भाजपने सत्तेत आल्यानंतर खेडेगावांचा चेहरा बदलण्यासाठी व पायाभूत सुधारणा करण्यासाठी आमदार आदर्शग्राम योजनेचा संकल्प केला. प्रत्येक आमदारांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत किमान तीन गावांना दत्तक घेण्याचे बंधन घातले आहे. त्यापैकी पहिल्या गावासाठी जुलै २०१७, दुसरे गाव जुलै २०१८, तिसरे गाव जुलै २०१९ पर्यंत आदर्शग्राम म्हणून विकसित करण्याची जबाबदारी आमदारांची राहणार आहे. या संदर्भात ग्राम विकास विभागाने मार्गदर्शक सूचनांचा आदेश जारी केला आहे. आपल्या मतदारसंघातील कोणत्याही तीन गावांची निवड करावयाचे स्वातंत्र्य आमदारांना देण्यात आले आहे. महात्मा गांधींनी भारत देश हा प्रामुख्याने खेड्यात असून, खेड्याकडे वळा, अशी हाक दिली होती. महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण आदर्श गाव निर्माण करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. सक्षम आणि पारदर्शी पंचायत, ग्रामस्थांचा स्थानिक सहभाग वाढवून लोकशाहीची मुळे आणखी घट्ट करणे, हा सुद्धा या योजनेचा लाभ आहे. शहरी मतदारसंघातील सदस्यांना सोईच्या भागातील गावांना प्राधान्य देता येईल, विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, आदींतून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना राज्यातील कोणतेही गाव दत्तक घेण्याची मुभा आहे. संबंधित आमदारांना स्वत:चे अथवा पत्नीचे गाव दत्तक घेता येणार नाही. या योजनेसाठी आतापासून साधारणपणे पावणेचार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या गावाची निवड आॅक्टोबर ३१ अखेर करण्याची मुदत आमदारांना देण्यात आली आहे. पहिले गाव जुलै २०१७ पर्यंत आदर्शग्राम होईल, असे नियोजन आमदारांना करावे लागणार आहे. दुसरे गाव २०१६ मध्ये अंतिम करून जुलै २०१८ पर्यंत विकसित करावयाचे आहे. तर तिसरे गाव २०१७ पर्यंत निश्चित करून जुलै २०१९ पर्यंत ते करावयाचे आहे. या योजनेत गावांची निवड करताना एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गाव निवडावयाचे आहे.पर्यावरणावर भर : सामाजिक एकोपा वाढवावा लागणार