शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सतेज पाटील, महाडिक गटात रस्सीखेच--बिद्री निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 18:43 IST

सरवडे : लोकमत.न्यूज नेटवर्क --दत्ता लोकरे--- बिद्री ता.कागल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातील सात गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देगट क्रमांक ७ वार्तापत्रआम.महाडीक हे राष्ट्रवादी च्या आघाडीबरोबर विधान परिषदेचे आमदार पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष दिसून येण्याची शक्यतामाघारीनंतर कार्यकर्त्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट

लोकमत.न्यूज नेटवर्कसरवडे : दत्ता लोकरे---  बिद्री ता.कागल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातील सात गावांचा समावेश आहे. या मतदारसंघावर प्रभाव असणा?्या आ.सत्तेज उर्फ बंटी पाटील आणि आ.अमल महाडीक याच्यातील रस्सीखेच या निवडणुकीत तीव्र होणार आहे.शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांचेही या गटावर वर्चस्व आहे. त्यामुळेच निवडणूक जरी बिद्रीची असले तरी पाटील आणि महाडिक गटाचा प्रभाव या गटावर असणार आहे.बदलत्या राजकीय समीकरणातुन या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप युती सोबत आ.अमल महाडिक यांची सर्व रसद असणार आहे. तर विरोधी माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांच्या राजर्षी शाहू आघाडीला माजी आ. पी.एन.पाटील यांची ताकद मिळणार आहे. तर आ. सतेज पाटील ही महाडीक यांच्या विरोधात ताकद उभे करतील अशी शक्यता आहे. यामुळे येथे महाडिक आणि पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.तरीही बिद्रीच्या निवडणुकीत यापूर्वी कधीच करवीर मधील एकाही प्रमुख नेत्यांनी कोणत्याही आघाडीच्या व्यासपीठावर येऊन उघड प्रचार केला नाही. परंतु पाटील आणि महाडिक यांचे कार्यकर्ते मात्र बिद्रीच्या रणांगणात एकाकी झुंज देणार हे निश्चित.

गतपंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीला माजी आमदार पी.एन. पाटील. यांच्या पाठिंबा होता . त्यांच्या कडून कृष्णात उर्फ बाळासाहेब पाटील(वडकशिवाले) याची उमेदवारी होती. तर विरोधी माजी आमदार के.पी. पाटील यांच्या महालक्ष्मी आघाडी ला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा.पाठिंबा होता. त्याच्याकडून श्रीपती पाटील(निगवे खालसा) यांच्यात लढत झाली. त्यात श्रीपती पाटील हे २२ हजार ८८१ मते घेऊन विजयी झाले. तर कृष्णात पाटील यांना १६हजार ९२५ मते पडली. त्यामुळे महालक्ष्मी आघाडीचे पाटील हे ५ हजार ९५६ मते घेऊन विजयी झाले.सध्या करवीर तालुक्यातील सात गावांच्या राजकीय समीकरणात बदल झाला आहे. आता करवीर मतदार. संघात येवती हे एकमेव गाव आहे. तर उर्वरित सहा गावांचा समावेश हा दक्षिण मतदार संघात झाला आहे. पूर्वीच्या रचनेनुसार पी.एन.पाटील यांचे प्राबल्य दिसून येत होते. सध्या या विधानसभा मतदारसंघातून आमदार अमल महाडीक हे प्रतिनिधित्व करत आहेत. तर आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करत आहेत. पी.एन.पाटील यांचा  जाधव यांच्या आघाडीला पाठिंबा आहे तर राष्ट्रवादी व भाजप आघाडी असल्याने आम.महाडीक हे राष्ट्रवादी च्या आघाडीबरोबर विधान परिषदेचे आमदार पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. तर दोन्ही आघाडी तून कोणत्या गटाला उमेदवारी यावर समीकरणांची जुळणी होणार आहे.त्यामुळे २८ सप्टेंबर च्या माघारीनंतर कार्यकर्त्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.बिद्रीच्या निवडणूकीत करवीर तालुक्यातील ७ गावांचा गट क्रमांक ७ मध्ये समावेश आहे. तर ३५१२ मतदार आहेत.सर्वाधिक १०९१ मतदार निगवे खालसा येथेआहेत.तर.बिद्रीसाठी एकूण मतदान ५७ हजार ८०९ इतके आहे.त्यामुळे निर्णायक मतदान असल्याने या गटाकडे. दोन्ही आघाडीचे लक्ष असणार आहे.गट क्रमांक ७ मधील गावे : निगवे खालसा १०९१, खेबवडे ६३५, चुये ५२३, कावणे ४४८, वडकशिवाले ४८९ ,इस्पूर्ली १३, येवती ३१२.यापूर्वी गत क्रमांक सात मधून प्रतिनिधित्व केलेले संचालक असे : १९९० ते ९५ :नामदेव कोंडीबा चौगले (निगवे.खालसा) ,१९९५ ते २०००: नामदेव कोंडीबा चौगले (निगवे खालसा) २००० त २००५ कृष्णात बंडू पाटील (वडकशिवाले) २००५ त २०१० :शशिकांत आनंदराव पाटील (चुये) ,२०१० त २०१५:श्रीपती बापू पाटील (निगवे खालसा)