कोल्हापूर : कोरोनामुळे सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना ‘गोकुळ’ ने दूध उत्पादकांना खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केल्याबद्दल साईसम्राट इन्स्टिट्यूट, फार्मर्स कंपनी व विविध उद्योगाकडून संघाचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार केला.
‘गोकुळ’ने म्हैस दूध खरेदी दरात दोन तर गाय दूध खरेदी दरात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल साईसम्राट इन्स्टिट्यूट, फार्मर्स कंपनी व विविध उद्योगाकडून विश्वस्त धैर्यशील वि. पाटील व सम्राटसिह वि. पाटील यांनी मंत्री पाटील यांचा सत्कार केला. मंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो कधीही नफ्यासाठी शेती न करता कर्तव्य म्हणून करतो. अविरत संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे ‘गोकुळ’च्या माध्यमातून जीवनमान उंचावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. अभिजित माने, रुचिता गांधी व भरत जाधव उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’ने दूध खरेदी दरात वाढ केल्याबद्दल साईसम्राट इन्स्टिट्यूट, फार्मर्स कंपनी व विविध उद्योगाकडून पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार केला. यावेळी धैर्यशील पाटील व सम्राटसिंग पाटील उपस्थित होते. (फोटो-२१०७२०२१-कोल-साईसम्राट न्यूज फोटो)