शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सासनकाठी मिरवणूक यंदा एक तास आधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:41 IST

कोल्हापूर/जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेदिवशी (दि. १९) सासनकाठ्यांची मिरवणूक एक तास आधी निघणार आहे. ही मिरवणूक ...

कोल्हापूर/जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेदिवशी(दि. १९) सासनकाठ्यांची मिरवणूक एक तास आधी निघणार आहे. ही मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी यासाठी हा निर्णय घेतला असून, यंदा १२ वाजता सासनकाठ्यांचे पूजन करून त्या मार्गस्थ करण्यात येतील. यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, समितीच्या वतीने परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.मंदिराची रंगरंगोटी, भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून कुल कोटिंग केले आहे. आवारातील फोल्डिंग ब्रिज, सर्व रॅम्प, क्यू रेलिंगची दुरुस्ती, ‘सार्वजनिक बांधकाम’कडून त्यांची तपासणी करून घेतली आहे. यंदा प्रथमच मंदिराच्या दक्षिण बाजूस दर्शन मंडप उभारला असून येथे बॅरिकेटिंग केले आहे. डोंगरावर प्रखर प्रकाशव्यवस्था केली असून रस्ते व पार्किंगठिकाणी ५० हॅलोजीन व चार मोबाईल जनरेटर हॅलोजीन लावले आहेत. पार्किंगसाठी डोंगर, पायथ्याशी असलेल्या जागांचे सपाटीकरण केले आहे. या ठिकाणांचे १५० दिशादर्शक बोर्ड लावले आहेत. दुकानदारांना नैसर्गिक गुलाल विक्री, खोबऱ्याचे बारीक तुकडे, खाद्य पदार्थांची काळजी, अन्न-औषधकडून परवाना, आदींच्या सूचना दिल्या आहेत.चैत्र यात्रेकरिता सोयीसुविधापार्किंग ते जोतिबा डोंगर व परत पार्किंगस्थळापर्यंत येण्यासाठी ४० केएमटीची मोफत बससेवा.मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सिंधिया ट्रस्ट येथील नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण१२ फायर एस्टिंग्विशर्सभाविकांसाठी १२५ तात्पुरती शौैचालये, दोन फिरती शौचालये१ अवजड, १ हलकी क्रेन सुसज्जप्रशासकीय कर्मचाºयांसाठी १० हजार अ‍ॅल्युमिनिअम फॉईल कंटेनरमंदिर, बाह्य परिसरात हॉस्पिटल, स्वयंसेवी संस्थांचे मेडिकल कॅम्पअग्निशमन दलाची दोन वाहनेमंदिर परिसर, दर्शनरांग, शिवाजी महाराज पुतळा व सेंट्रल प्लाझा येथे मोठे एलईडी स्क्रीन‘सहजसेवा’तर्फे आजपासून अन्नछत्रयात्रेकरूंना गेल्या १९ वर्षांपासून मोफत जेवणाची सोय करणाºया सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र आज, बुधवारपासून गायमुख येथे सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध असेल, अशी माहिती सन्मती मिरजे यांनी दिली.शुक्रवारी मुख्य सोहळाचैत्र यात्रेचा शुक्रवारी (दि. १९) मुख्य दिवस आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, पहाटे ४ ते ५ पाद्यपूजा, पहाटे ५ वाजता पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांचे हस्ते शासकीय महाभिषेक होईल. सकाळी ६ वाजता श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटात पगडी उत्सव महापूजा बांधली जाईल. सकाळी १० वाजता धुपारती प्रारंभ, दुपारी १२ वा. धुपारती सांगता, दुपारी १२ वा. सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होईल. दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत सर्व मानाच्या सासनकाठ्या यमाई मंदिरात दाखल होतील. सायं ५.४५ तोफेची सलामी होताच जोतिबा देवाचा मुख्य चैत्र पालखी सोहळा जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होईल. सायं. ६.४५ वा. जमदग्नी -रेणुका मातेचा विवाह सोहळा होईल. सायं. ७.३० श्री जोतिबा पालखी पुन्हा जोतिबा मंदिरातील सदरेवर विराजमान होईल. रात्री ९ वा. तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता होईल.बेळगावची मानाची सासनकाठी दाखलजोतिबाची चैत्र यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना मंगळवारी दुपारी बारा वाजता कर्नाटकातील बेळगाव येथील चव्हाट गल्ली आणि नार्वेकर गल्लीतील मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या. १२७ किलोमीटर अंतर चालत जोतिबा डोंगर येथे दरवर्षी बेळगावच्या सासनकाठ्या दाखल होतात. तीन दिवस जोतिबा डोंगरावर यांचे वास्तव असते. बेळगावहून चार दिवसांपूर्वी बैलगाडीतून निघालेली सासनकाठी मंगळवारी दुपारी बारा १२ वाजता जोतिबा डोंगरावर दाखल झाली. सोबत पारंपरिक वाद्यांबरोबर अबदागिरी, पताका, ढोल-ताशा, मशाल, भगव्या पताका अशा लवाजम्यासह सासनकाठी मंदिरात दाखल झाली. यावेळी महिलांनी सासनकाठीचे औक्षण केले. मंदिरात गावकºयांनी सासनकाठीचे स्वागत केले. मंदिर प्रदक्षिणा काढल्यानंतर सासनकाठी मूळस्थानी रवाना करण्यात आली. यावेळी सासनकाठीसोबत बेळगावातील चव्हाट गल्ली आणि नार्वेकर गल्लीतील भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.