शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांचा ‘सवता सुभा’

By admin | Updated: May 20, 2015 00:23 IST

महाडिक यांच्याबद्दल नाराजी : लटोरे, मोदी, कदम यांचा ‘दे धक्का’

राजाराम लोंढे -कोल्हापूर -गेले दहा-पंधरा वर्षे महापालिकेच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या ताराराणी आघाडीचे सुनील मोदी, सुहास लटोरे, सुनील कदम या तिघा सुभेदारांनी सवता सुभा मांडण्याची तयारी सुरू केली. ‘राजाराम’ कारखाना , ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासूनच या नेत्यांनी आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी फारकत घेतली. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत नवीन समीकरणे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. हे तिघेही तसे आमदार महाडिक यांच्यापेक्षा खासदार महाडिक यांचे नेतृत्व मानतात. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत प्रा.जयंत पाटील यांना महाडिक यांनी मदत करू नये असा त्यांचा आग्रह होता. परंतू तरीही महाडिक यांनी जयंत पाटील यांनाच मदत केली. त्यामुळे दुखावलेल्या या तिघांनी ईर्षेवर अनिल पाटील यांच्या विजयासाठी ताकद लावली व त्यांना निवडून आणले. आमदार महाडिक यांच्यापासून फारकत घेण्याचे हे मुळ कारण आहे. परंतू त्याने महाडिक यांच्या राजकारणावर फार परिणाम होण्याचीही शक्यता नाही. आमदार महाडिक यांनी महापालिकेत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अनेक वर्षे सत्ता हस्तगत केली. ‘निवडून येईल तो आपला’, हा फॉर्म्युला वापरून राजकारण केल्याने त्यांच्याबरोबर ‘ताराराणी आघाडी’ ही यशस्वी झाली, पण आघाडीला बळ देण्याचे काम या शिलेदारांनी केले. प्रभागातील उमेदवारी निश्चित करण्यापासून ते निवडून येईपर्यंत जोडण्या लावण्यात या तिघांचा पुढाकार असे. महापालिका निवडणुकीतच नव्हे तर महाडिक यांच्या विधान परिषद निवडणुकीतही या तिघांनी कंबर कसली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी कोल्हापूर शहरासह शेजारील गावांत प्रचारयंत्रणा राबविली. विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून आमदार अमल महाडिक यांना विजयी करण्यात तिघांचा मोठा हातभार होता. आता यांनी महाडिक यांच्यापासून फारकत घेतली आहे. ज्यावेळी कोणतीच सत्ता नव्हती त्यावेळी आम्ही किल्ला सांभाळला आता सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. महापालिकासह ‘दक्षिण’ च्या राजकारणात एकाचवेळी माजी राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गजांना अंगावर घेतले. एवढे करूनही मानसन्मान मिळत नसल्याने ते गेले तीन महिने अस्वस्थ आहेत. राजाराम साखर कारखाना, ‘गोकुळ’, जिल्हा बँक निवडणुकीत आमदार महाडिक यांनी घेतलेली भूमिका या तिघांना मान्य नव्हती. त्यामुळे तिघांनी सवता सुभा मांडण्याची तयारी सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वी एका ठिकाणी बैठक घेऊन महापालिका निवडणुकीची चाचपणीही केली. प्रभागनिहाय संभाव्य आरक्षण काय असेल, तेथील इच्छुकांची संख्या आणि कोणाला ताकद देता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. दहा वर्षांत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी प्रामाणिक राहिलो. त्यांच्यावरील प्रेमासाठी अनेकांना अंगावर घेतले, पण अलीकडे त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने आम्ही नाराज आहोत. खासदार धनंजय महाडिक यांच्याशी आमचे जवळचे संबंध असल्याने ते सांगतील त्यानुसार महापालिका निवडणुकीत काम करू. - सुहास लटोरे