सरवडे : येथील व्यापारी असोसिएशन को-ऑफ क्रेडिट सोसायटीस अहवाल सालात २१ लाख ९० हजार ५१७ रुपये नफा झाला असून सभासदांना ७ टक्के प्रमाणे लाभांश व दिवाळी भेट देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कुंडलिक पाटील यांनी दिली.
सरवडे येथील संस्थेच्या ५ व्या ऑनलाइन वार्षिक सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी चर्चेत शिवाजी वागवेकर, बाजीराव मोरे, शंकर पोवार, वाय. के. वाईंगडे, चंद्रकांत शेलार आदी सभासदांनी भाग घेतला.
यावेळी संचालक गणपती आरडे, तुकाराम नवाळे, अजित रानमाळे, सचिन जठार, पांडुरंग खोत, सचिन वागवेकर, शरदचंद्र पोवार, विजय येटाळे, प्रशांत पाटील, मनोज पोवार, संजय गुरव, नंदकिशोर मोरे, वैशाली मगदूम, ज्योती खोराटे, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कुंडलिक पाटील यांनी स्वागत केले. मॅनेजर बाळासाहेब कदम यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी आभार मानले.
फोटो
सरवडे : संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना अध्यक्ष कुंडलिक पाटील.
२५ सरवडे व्यापारी सोसायटी