शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

सरपंचांना तुटपुंजे मानधन...

By admin | Updated: July 17, 2015 23:06 IST

उपसरपंचांना मानधन नाही.. : मानधनात वाढ करण्याची मागणी

नाना जाधव - भादोले -ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना शासन आणि ग्रामपंचायतीकडून अतिशय तुटपुंजे मानधन मिळत असून, उपसरपंचांना तर मानधनच मिळत नाही. शासनाच्या विविध योजनांची गावात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, उपसरपंचांना तसेच ग्रामपंचायत सदस्यांना तालुक्यात, जिल्ह्यात पदरमोड करून हेलपाटे मारावे लागत असल्याने शासनाने सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामपंचायत सरपंचांना शासन आणि ग्रामपंचायतीमार्फत मानधन देण्यात येते. हे मानधन लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टप्प्यांवर निश्चित करण्यात आले आहे. दोन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचांना मासिक ४०० रुपये, तर दोन हजार ते आठ हजारांपर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावातील सरपंचांना ६०० रुपये, तर आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचांना ८०० रुपये मानधन देण्यात येते. यापैकी ७५ टक्के मानधन शासनाकडून, तर २५ टक्के मानधन ग्रामपंचायतीकडून देण्यात येते.एकंदरीत सरपंचांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळते. सरपंचांच्या गैरहजेरीत कार्यभार पाहणाऱ्या उपसरपंचांना मासिक २५ रुपये मानधन देण्यात येते. तसेच महिला सरपंच असणाऱ्या अनेक गावांत उपसरपंचांना विकासकामांचा पाठपुरावा करावा लागतो. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अनेक योजना थेट गावांमध्ये राबविण्यात येतात. या योजनेच्या माहितीसाठी तालुकास्तरावर, जिल्हा स्तरावर बैठकीचे आयोजन होते. यासाठी सरपंचांना उपस्थित राहावे लागते. विविध कामांचा निधी मिळविण्यासाठी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व खासदार यांना भेटून निधीसाठी पाठपुरावा करावा लागतो. या प्रवास खर्चासाठी सरपंच, उपसरपंच यांना पदरमोड करावी लागते. याची शासनाने दखल घेऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना अतिशय कमी मानधन मिळते. त्यांच्या मानधनात वाढ करावी. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - सुजित मिणचेकर, आमदार