शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोगे, खुपिरे, शिरटी, मजरेवाडी, तळेवाडीचे सरपंच आरक्षण ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे, खुपिरे, शिरोळ तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी तर गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे, खुपिरे, शिरोळ तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी तर गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण कायम राखले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी याबाबतचा निकाल दिला. फणसवाडी (ता. भुदरगड) व तमदलगे (ता. शिरोळ) आरक्षणाबाबत आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर सरपंचपदासाठी आरक्षण काढण्यात आले, त्यानुसार ९ फेब्रुवारीला सरपंच निवडीचा कार्यक्रमही जाहीर झाला. मात्र, कोगे आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, खुपिरे आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे, शिरटी आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडारे व कुमार रोजे, मजरेवाडी आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य किशोर जुगळे व लक्ष्मण चौगुले, तळेवाडी आरक्षणावर सदस्य लक्ष्मीबाई सुतार यांनी उच्च न्यायालयात हरकत घेतली होती. न्यायालयाने संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊन निकाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊन आतापर्यंत उंड्री, कोगे, खुपिरे, मजरेवाडी, तळेवाडी सहा ग्रामपंचायतींचे आरक्षण कायम ठेवल्याचा निकाल दिला. त्यामुळे करवीर, गडहिंग्लज तालुक्यातील सरपंच निवडींचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला.

निमशिरगाव, दानोळी, शिरदवाडचे आरक्षण बदलणार?

शिरोळ तालुक्यातील ‘नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गा’साठी निश्चित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे आरक्षण प्रक्रिया तपासली असता, निमशिरगाव, दानोळी, शिरदवाड, तमदलगे येथे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ किंवा ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रवर्ग’ असा बदल होऊ शकतो. निमशिरगाव गावास २००० मध्ये ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ आरक्षण असल्याने तेथे आळीपाळीचे तत्त्वाने ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री’ आरक्षण देय होते. असे सकृतदर्शनी निदर्शनास येते. त्यामुळे दानोळी, शिरदवाड, तमदलगे या गावांतून चिठ्ठीद्वारे एका ग्रामपंचायतीचे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री’ आरक्षण काढणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.