शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामसेवकांवर लवकरच कारवाई ?

By admin | Updated: March 2, 2016 01:26 IST

आमजाई व्हरवडेतील पेयजल अपहार : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लक्ष

सुनील चौगले -- आमजाई व्हरवडे --आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी संबंधित पाचजणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर कारवाई का करू नये याबाबत गेल्या आठवड्यात नोटीस बजावून खुलासा देण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले होते. मात्र, समाधानकारक खुलासा नसल्याचा अहवाल राधानगरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार दोन दिवसांत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याने सर्व तालुक्याच्या कारवाईकडे नजरा लागल्या आहेत.आमजाई व्हरवडे येथे ४९ लाख रुपयांच्या पेयजल योजनेत साडेचार लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.गेल्या तीन महिन्यांपूर्वीच संबंधित पाचजणांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तक्रारदार गावकऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी सुभेदार यांच्याकडे केली. या दोघांवर कारवाई झाली नाही, तर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे सुभेदार यांनी या दोघांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गेल्याच आठवड्यात या दोघांना नोटीस बजावून सरपंचांना अपात्र करून फौजदारी का करू नये, तर ग्रामसेविकेला निलंबित करून त्यांच्यावरही फौजदारी का करू नये, अशी नोटीस बजावून पाच दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीत हे दोघेही दोषीच असल्याचे प्रत्यक्षदर्शी स्पष्ट होत असल्याने खुलासा काय देणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले होते. गट विकास अधिकारी यांच्याकडे या दोघांनी खुलासा दिला होता. हा खुलासा समाधानकारक नसल्याचा अहवाल मंगळवारी गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारणारच असल्याने संपूर्ण तालुक्याचे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. घुले यांच्याशी संपर्क साधला असता सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. राधानगरीचे गटविकास अधिकारी नाईक यांनी मंगळवारी आमच्याकडे अहवाल दिला असून, या अहवालात समाधानकारक खुलासा नसल्याचे स्पष्ट आहे. हा अहवाल मुख्य कार्यकारी यांच्याकडे सोपविला जाणार असून, कारवाईबाबत तेच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.