शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामसेवकांवर लवकरच कारवाई ?

By admin | Updated: March 2, 2016 01:26 IST

आमजाई व्हरवडेतील पेयजल अपहार : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लक्ष

सुनील चौगले-- आमजाई व्हरवडे आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी संबंधित पाचजणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर कारवाई का करू नये याबाबत गेल्या आठवड्यात नोटीस बजावून खुलासा देण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले होते. मात्र, समाधानकारक खुलासा नसल्याचा अहवाल राधानगरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार दोन दिवसांत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याने सर्व तालुक्याच्या कारवाईकडे नजरा लागल्या आहेत.आमजाई व्हरवडे येथे ४९ लाख रुपयांच्या पेयजल योजनेत साडेचार लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.गेल्या तीन महिन्यांपूर्वीच संबंधित पाचजणांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तक्रारदार गावकऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी सुभेदार यांच्याकडे केली. या दोघांवर कारवाई झाली नाही, तर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे सुभेदार यांनी या दोघांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गेल्याच आठवड्यात या दोघांना नोटीस बजावून सरपंचांना अपात्र करून फौजदारी का करू नये, तर ग्रामसेविकेला निलंबित करून त्यांच्यावरही फौजदारी का करू नये, अशी नोटीस बजावून पाच दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीत हे दोघेही दोषीच असल्याचे प्रत्यक्षदर्शी स्पष्ट होत असल्याने खुलासा काय देणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले होते. गट विकास अधिकारी यांच्याकडे या दोघांनी खुलासा दिला होता. हा खुलासा समाधानकारक नसल्याचा अहवाल मंगळवारी गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारणारच असल्याने संपूर्ण तालुक्याचे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. घुले यांच्याशी संपर्क साधला असता सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. राधानगरीचे गटविकास अधिकारी नाईक यांनी मंगळवारी आमच्याकडे अहवाल दिला असून, या अहवालात समाधानकारक खुलासा नसल्याचे स्पष्ट आहे. हा अहवाल मुख्य कार्यकारी यांच्याकडे सोपविला जाणार असून, कारवाईबाबत तेच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.