शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावच्या महापौरपदी सरिता पाटील

By admin | Updated: March 4, 2016 23:55 IST

संजय शिंदे उपमहापौर : महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी सरिता पाटील, तर उपमहापौरपदी संजय शिंदे यांची शुक्रवारी निवड झाली. दोघेही पदाधिकारी मराठी भाषिक असून मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर आपलेच वर्चस्व सिद्ध केले आहे.महापौर निवडणुकीत सरिता पाटील यांना ३२, तर कन्नड उर्दू गटाच्या प्रतिस्पर्धी जयश्री माळगी यांना २५ मते मिळाली. उपमहापौर निवडणुकीत संजय शिंदे यांना ३१, तर प्रतिस्पर्धी महांतेश कागतीकर यांना २५ मते मिळाली. मराठी भाषिक नगरसेवकांनी बेळगाव विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन निवडणूक लढवली.निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्तपदाचा पदभार सांभाळणारे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी काम पाहिले. निवडणुकीची प्रक्रिया सुरूझाल्यावर सकाळी महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी नऊ अर्ज दाखल करण्यात आले होते. महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने नगरसेवक पिंटू सिद्दकी यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. चार मराठी भाषिक नगरसेविकांनी उमेदवारी मागे घेतली. विरोधी कन्नड, उर्दू गटाच्या अनुश्री देशपांडे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे महापौरपदासाठी सरिता पाटील व जयश्री माळगी यांच्यात सरळ लढत झाली. सरिता पाटील यांना ३२ तर जयश्री माळगी यांना २५ मते मिळाली. ७ मतांनी सरिता पाटील विजयी झाल्या.