शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सराईत घरफोड्या नागरगोजेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 16:44 IST

कोल्हापूर : कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानक संशयितरित्या फिरत असताना रेकॉर्डवरील (अभिलेख) सराईत घरफोड्या राजू प्रकाश नागरगोजे उर्फ राजविर सुभाष देसाई (वय , २९ रा. सावंत गल्ली, उचगांव,ता. करवीर मूळ राहणार एकतानगर निपाणी जि.बेळगांव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गस्त घालत असताना सापळा रचून गुरुवारी पकडले. त्याच्याकडून चार घरफोडीच्या गुन्ह्यातील ...

ठळक मुद्देचार ठिकाणच्या घरफोड्या उघडकीस १३ लाख ५० हजारांचा सोन्याचे दागिने जप्तनागरगोजे रेकॉर्डवरील सराईत घरफोड्यागस्त घालत असताना सापळा रचून पकडले

कोल्हापूर : कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानक संशयितरित्या फिरत असताना रेकॉर्डवरील (अभिलेख) सराईत घरफोड्या राजू प्रकाश नागरगोजे उर्फ राजविर सुभाष देसाई (वय , २९ रा. सावंत गल्ली, उचगांव,ता. करवीर मूळ राहणार एकतानगर निपाणी जि.बेळगांव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गस्त घालत असताना सापळा रचून गुरुवारी पकडले. त्याच्याकडून चार घरफोडीच्या गुन्ह्यातील ४६७ ग्रॅमचे सुमारे १३ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्यावर लक्ष ठेवण्याचे सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण दिल्या.त्यामुळे शाखेने चार विविध तपास पथके तयार केली. त्यानुसार ही पथके गस्त घालत असताना संशयित राजू नागरगोजे हा मध्यवर्ती बसस्थानक फिरत असल्याचे त्यांना दिसले.त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या कब्जात सोन्याचा लप्पा, सोन्याची चेन, सोन्याच्या लहान अंगठ्या असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने जुना राजवाडा व राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा एकूण चार ठिकाणी घरफोड्या केल्याचे नागरगोजे याने सांगितले.

त्याच्याकडून या घरफोडीतील सोन्याचे दागिने जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, प्रवीण चौगुले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक अमोल माळी, राजेंद्र सानप, युवराज आठरे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी केली.