शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

कोल्हापुर जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:36 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

ठळक मुद्देधरणक्षेत्रात अतिवृष्टी : ‘राधानगरी’चे सातही दरवाजे खुले१५ बंधारे पाण्याखाली; ‘भोगावती’ पात्राबाहेरराधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

मागील आठवड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस रोज हजेरी लावत होता. तासभर कोसळल्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन पडत होते; पण गेले तीन-चार दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत तब्बल १०४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांत व धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरीचे क्रमांक ३ व ६ हे दोन दरवाजे खुले होते; पण त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून प्रतिसेकंद १२ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद १२ हजार ५६७, तर दूधगंगा धरणातून २४५० घटफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील सहा नद्यांवरील १५ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात बारा घरांची पडझड झाल्याने चार लाख पाच हजारांचे नुकसान झाले आहे.‘पंचगंगे’च्या पातळीत वाढमंगळवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १६ फुटांवर होती; पण सायंकाळी सहा वाजता ती २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. दिवसभर तब्बल सहा फुटांनी पाण्याची पातळी वाढली.तालुकानिहाय पाऊस हातकणंगले- ९.१२, शिरोळ- ७.००, पन्हाळा- २६.००, शाहूवाडी- ३०.६७, राधानगरी- ३३.८३, गगनबावडा- १०४.५०, करवीर- १७, कागल- १५.५७, गडहिंग्लज- १६.५७, भुदरगड- २६.००, आजरा- ३६.२५, चंदगड- ३५.५०.झडीचा पाऊस आणि गारठा!साधारणत: जुलै महिन्यात झडीचा पाऊस सुरू असतो. संततधार पावसाने हवेत गारठा व कुबट वातावरण असते.असेच वातावरण गेले चार दिवस जिल्ह्यात आहे. हवेत गारठा असल्याने नागरिक घरातून बाहेर पडण्यास टाळत आहे.