शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात संस्कृत विषय

By admin | Updated: February 11, 2016 23:41 IST

केवळ तोंडी स्वरूपात समावेश : संस्कृत भाषेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा शासनाचा प्रयत्न

भरत शास्त्री -बाहुबली --संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असूनही या भाषेला शालेय अभ्यासक्रमांत म्हणावे तेवढे महत्त्व दिलेले नाही. सध्या राज्य शासनाच्या भाषा अभ्यासक्रमात इयत्ता आठवीपासून संस्कृत शिकविले जाते. तथापि, त्याही अगोदरच्या इयत्तांपासून संस्कृत शिकवावे, अशी मागणी संस्कृतप्रेमी व शिक्षक करीत आहेत. शासनाच्या संस्था एन.सी.ई.आर.टी., विद्यापरिषद व शिक्षण विभाग याबाबत सकारात्मक असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून केवळ तोंडी स्वरूपात इयत्ता सहावीपासून ही भाषा सुरू करण्यासाठी अंतिम आराखडा तयार करीत आहेत. राज्यात सध्या त्रिभाषा सूत्रानुसार अभ्यासक्रमाची रचना आहे. त्यामध्ये आठवीपासूनच हिंदी विषयाला पर्याय म्हणून संस्कृत विषय अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याचवेळी सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून संस्कृत हा विषय आहे. त्याला पालकांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे असतो. शिवाय अन्य राज्यांमध्ये देखील संस्कृत विषयाचे अध्यापन काही ठिकाणी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गापासून केले जाते; पण महाराष्ट्रात आठवीपासून संस्कृतचा श्रीगणेशा होतो. त्याऐवजी पाचवीपासून संस्कृत विषय असावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. २०१२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने सहावीपासून संस्कृत सुरू करण्यासाठी आराखडा व अभ्यासक्रम तयार करून घेतले; परंतु राजकीय दबावामुळे त्याला मूर्त रूप येऊ शकले नाही. आता चार वर्षांनंतर पुन्हा सहावीपासून तोंडी स्वरूपातच असेना, पण संस्कृत भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे.सहावीपासून जरी संस्कृत विषय सुरू केला, तरी ज्यादाचे विषय शिक्षक दिले जाणार नाहीत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये संस्कृत शिक्षक आहेत, त्याठिकाणीच सध्या तरी हा विषय सुरू करता येणार आहे. हे करीत असताना हिंदी विषय व शिक्षकांच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा येणार नाही, याबाबत शासन आग्रही आहे.संस्कृत भाषेत अपूर्व ज्ञानाचे भांडार आहे. विज्ञान, गणित व भूगोल यांसारख्या क्षेत्रातील अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांचे अध्ययन व संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांमध्ये संस्कृत भाषेची गोडी निर्माण होणे अपेक्षित आहे. सहावीपासून संस्कृत सुरू करणे हा त्याचाच एक भाग आहे.- प्राची साठे (विशेष कार्यकारी अधिकारी, शिक्षणमंत्री कार्यालय, मुंबई)सहावीपासून संस्कृत विषय सुरू करण्यासाठी आवश्यक आराखडा व अभ्यासक्रम तयार आहे. शासनाकडून जसे आदेश प्राप्त होतील, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करणार आहोत. - अनुराधा ओक (अभ्यासक्रम विकसन विभागप्रमुख, एन.सी.ई.आर.टी., पुणे)