शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नूलच्या गडकरी गल्लीत ‘सन्नाटा’; महागावच्या अपघाताने शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:50 IST

राम मगदूम । लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : महागावनजीकच्या अपघातात मरण पावलेले सुमो चालक नामदेव चव्हाण, त्यांचा मुलगा मनोज ...

राम मगदूम ।लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज : महागावनजीकच्या अपघातात मरण पावलेले सुमो चालक नामदेव चव्हाण, त्यांचा मुलगा मनोज व आप्पा सुपले यांच्यावर शनिवारी रात्री अकराला, तर इंजिनिअर चंद्रकांत गरूड यांच्यावर रविवारी पहाटे चारला अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही गडकरी गल्लीतील रहिवासी असल्यामुळे शनिवारी रात्री गल्लीतील एकही चूल पेटली नाही. सामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या अकाली मृत्यूमुळे गडकरी गल्लीवर मोठा आघात झाला आहे. रविवारी दिवसभर या गल्लीत सन्नाटाच होता.शिवकालीन किल्ले सामानगडचे सेवक म्हणून ओळखले जाणारी अठरापगड जातीची कुटुंबं श्री शंभू महादेवाच्या देवळानजीक अनेक वर्षांपासून एकत्र राहतात. म्हणूनच या गल्लीला ‘गडकरी गल्ली’ म्हणून ओळखले जाते.२०१२ पासून या गल्लीतील महादेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. त्यात चव्हाण व सुपलेंचा सक्रिय सहभाग होता. या मंदिराची वास्तुशांती व कलशारोहण सोहळा मे मध्ये करण्याचे नियोजन सुरू असतानाच दोघेही एकाचवेळी देवाघरी गेले.आजवर एकही वाईट प्रसंग न ओढवलेल्या ‘नामदेव’च्या गाडीतून या गल्लीतील काही मंडळी लोकसभेच्या प्रचारसभेकरिता सरंबळवाडीला गेली होती. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वाहून घेतलेले गरूडदेखील याच गाडीत होते. गल्लीतील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गडकरी गल्लीसह संपूर्ण गावच सुन्न झाले आहे.आधारच तुटला..!सुमो चालक नामदेव व त्यांचा मुलगा मनोज याच्या मृत्यूमुळे त्यांच्या अल्प भूधारक कुटुंबाचा आधारच तुटला आहे. पती व मुलाच्या एकाचवेळी अकाली जाण्याने त्यांच्या पत्नी व मुलींना मोठा मानसिक धक्का बसला आहे.‘महादेवा’चेभक्त म्हणून..!चव्हाण व सुपले हे शंभू महादेवाचे भक्तहोते. महादेवाच्या वार्षिक यात्रेत दोघेही हिरिरीने भाग घेत. महादेवाचा वार असल्याने सोमवारी रक्षाविसर्जन न करण्याची गल्लीची प्रथा आहे. त्यामुळे त्यांचे रक्षाविसर्जनही रविवारी करण्यात आले.