शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संजीव पुनाळेकर यांना अटक करा

By admin | Updated: February 8, 2016 01:11 IST

पानसरे समता संघर्ष समिती : याप्रकरणी स्वत: लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कोल्हापूर : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सनातन संस्थेच्या अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर खटला दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागशी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या विषयात आपण स्वत: लक्ष घालू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.रेसिडेन्सी क्लब येथे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मेघा पानसरे, चंद्रकांत यादव यांनी अ‍ॅड. पुनाळेकर हे जाहीरपणे समीर गायकवाडची बाजू घेत असून, त्याचे समर्थन केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.सनातन संस्थेचे साधक चार बॉम्बस्फोटांत सापडले आहेत. २००८ मध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सनातनचे रमेश गडकरी व विक्रम भावे यांना दहा वर्षांची शिक्षा झाली. २००९ मध्ये मडगाव बॉम्बस्फोटात सहा साधकांवर आरोप होऊन त्यांमधील रुद्र पाटील अद्याप फरार आहे. २०११मध्ये वाशी बॉम्बस्फोटात सनातनच्या साधकांना अटक झाली. २००८ मध्ये सनातनच्या हस्तकावर पनवेलच्या बॉम्बस्फोटाचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांना २०१५ मध्ये भेकडपणे गोळ्या घातल्या. या आरोपावरून ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याला अटक झाली आहे. सकृतदर्शनी पुरावे असल्यामुळे या आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला आहे. समीर गायकवाडचे वकील पुनाळेकर साक्षीदारांना धमकावीत आहेत. त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पुनाळेकर आपल्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राला हिंदू राष्ट्र करणार असल्याचे जाहीर करीत आहेत. धर्मनिरपेक्ष राष्ट्राला हिंदू किंवा मुस्लिम राष्ट्र बनवू इच्छिणारे देशद्रोही आहेत. गोविंद पानसरे यांच्यावर वाटेल ते आरोप करून पुनाळेकर समाजभावना भडकवित आहेत. त्यामुळे त्यांना अटक करून सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उदय नारकर, अनिल चव्हाण, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, शिवाजीराव परुळेकर, बाबूराव कदम, सुवर्णा तळेकर, सुभाष वाणी, दिलदार मुजावर, आदी उपस्थित होते.