शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

संजीव पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला-पोलिसाचाही समावेश : सनी पोवार मृत्यूप्रकरण

By admin | Updated: September 15, 2014 23:46 IST

अटकेचे दिल्लीहून आदेश

कोल्हापूर : वडगाव (ता. हातकणंगले) येथील जगदिश ऊर्फ सनी प्रकाश पोवार मृत्यूप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव रामचंद्र पाटील व पोलीस नाईक धनाजी शिवाजी पाटील यांचा आज, सोमवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. बसवर दगडफेक केल्याच्या कारणावरून वडगाव पोलिसांनी सनी पोवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईक व दलित संघटना आक्रमक होऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. तसेच संबंधित पोलीस अधीकारी संजीव पाटील, बबन शिंदे व धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तत्काळ पाटील यांच्यासह दोघा पोलिसांना निलंबित केले. त्यानंतर मृत सनीचा भाऊ जयदीप पोवार याने फिर्याद दिल्याने तिघांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (३०२) दाखल झाला. त्यापासून ते पसार होते. सीआयडी पोलिसांनी यापूर्वी बबन शिंदे याला अटक केली, तर संशयित आरोपी सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व धनाजी पाटील हे पसार झाले. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी जोरदार हरकती घेत मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानत अतिरिक्त न्यायाधीशांनी दोघांचेही अर्ज नामंजूर केले. (प्रतिनिधी) अटकेचे दिल्लीहून आदेश संजीव पाटील व धनाजी पाटील हे दोघे कायद्याचा आधार घेत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला असला तरी ते उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे समजते. दरम्यान, या दोघांना अटक करण्यासाठी दिल्ली येथील केंद्रीय सीआयडी विभागाने पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे आदेश दिले आहेत. तपास अधिकारी मा. शा. पाटील यांना हे पत्र मिळाले आहे. त्यानुसार या दोघांना दिसताक्षणी अटक केली जाणार आहे.