शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

संजीव दयाळ यांची न्यायालयात साक्ष

By admin | Updated: November 21, 2014 23:56 IST

कुलकर्णी लाच प्रकरण : राज्याच्या महासंचालकांच्या साक्षची दुसरी वेळ

कोल्हापूर : जातपडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोन दक्षता पथकाचे संशयित पोलीस निरीक्षक विजय गोविंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या लाच प्रकरणाच्या खटल्यातील सुनावणीसाठी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्यासमोर आज, शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी उपस्थित राहून साक्ष दिली. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात साक्षीदार म्हणून येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एका खटल्यात सूर्यकांत जोग हे पोलीस महासंचालक असताना साक्षीसाठी न्यायालयात हजर राहिले होते.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरज (जि. सांगली) येथील श्रीमती फरिदा जहाँगीर जमादार यांनी दोन मुलांसाठी जातपडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोनकडे अर्ज केला होता. यावेळी संशयित पोलीस निरीक्षक विजय गोविंद कुलकर्णी (रा. स्वामी समर्थ मठाजवळ, चिंचवड, पुणे) वरिष्ठांना अनुकुल अहवाल देण्यासाठी तीन आॅक्टोबर २०११ रोजी २० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत फरिदा जमादार यांनी कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर दोनवेळा लाचेची पडताळणी पोलिसांनी केली. त्यानंतर १० आॅक्टोबर २०११ ला सापळा रचून दहा हजार रुपयांची लाच घेताना संशयित विजय कुलकर्णी यांना पोलिसांनी पकडले. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एम. डी. शिंदे यांनी, विजय कुलकर्णी हे प्रथम श्रेणीचे अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईसाठी सर्व कागदपत्रे व न्यायालयात खटला चालविण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी मंजूर केला. त्यानंतर आज, शुक्रवारी टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात साक्ष देण्यासाठी सकाळी ११ वाजता संजीव दयाल एम. बी. तिडके यांच्या न्यायालयात आले होते. सुमारे तासभर साक्ष झाली. सरकारच्यावतीने साहाय्यक सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी सरतपास केला तर बचाव पक्षांच्या वकिलांनी उलट तपास केला. पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.