शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

संजयकुमार यांनी घेतली उमा पानसरे यांची भेट

By admin | Updated: May 5, 2015 01:13 IST

घटनास्थळाचीही पाहणी

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासाच्या पार्श्वभूमीवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (एसआयटी) अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरील साक्षीदार उमा पानसरे यांची सोमवारी सकाळी घरी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत हल्ल्यासंदर्भात काही माहिती त्यांच्याकडून त्यांनी घेतली. त्यानंतर घटनास्थळाचीही त्यांनी पाहणी केली. पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या सामाजिक, राजकीय, कौटुंबीक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का, अशी शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व पातळ्यांवर माहिती घेतली. तथापि, यासंदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. दोन महिने होऊनही या हत्येचा तपास होत नाही, यासंदर्भात पानसरे यांची मुलगी स्मिता आणि सून मेघा यांनी दि. १८ एप्रिलला उच्च न्यायालयात एक स्वतंत्र याचिका दाखल करून हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वीच राज्य सरकारने पानसरे हत्या प्रकरणाचे सर्वाधिकार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्याकडे दिले.तेरा दिवसांच्या कालावधीत कोणत्या स्तरावर तपास सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी ते सोमवारी सकाळी कोल्हापुरात आले होते. पानसरे यांच्यावर सकाळी नऊच्या सुमारास हल्ला झाला होता. त्याच वेळेत त्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आजूबाजूला वस्ती किती आहे, कोण-कोण राहते, याचीही देखील त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी उमातार्इंची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करत त्यांचे खचलेले मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला तसेच एसआयटीची पथक कसा तपास करणार आहे, याची माहितीही त्यांना दिली. त्याचबरोबर हल्ल्यासंदर्भात मारेकऱ्यांबाबत त्यांनी माहिती घेण्याचाही प्रयत्न केला.