शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

संजय घाटगे गटाचा आबिटकर गटाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:32 IST

म्हाकवे : ऊन, वारा, पाऊस यांसह नैसर्गिक आपत्तींचा सामना करून अख्खे शेतकरी कुटुंब ऊस पिकविते. त्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळवून देण्याचे आणि बिद्री कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्याचे काम

ठळक मुद्देसत्तेची हाव असणारे मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीत.‘बिद्री’ला राजकीय अड्डा बनविणाºया आणि ‘खोटे बोल, पण रेटून बोल,’ अशी प्रवृत्ती जोपसाणाºयांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करूया.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : ऊन, वारा, पाऊस यांसह नैसर्गिक आपत्तींचा सामना करून अख्खे शेतकरी कुटुंब ऊस पिकविते. त्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळवून देण्याचे आणि बिद्री कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्याचे काम केवळ दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच करू शकते. म्हणूनच आम्ही त्यांना ‘बिद्री’च्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्धार केला असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी स्पष्ट केले. शेतकºयांची असणारी जिल्हा बँक, भूविकास बँकेसह दहा वर्षांच्या काळात बिद्री साखर कारखान्यालाही आर्थिक अडचणीत आणणाºया आमदार मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्या अप्प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आपल्या गटाचा हा निर्णय असल्याचे घाटगे म्हणाले.व्हन्नाळी (ता. कागल) येथे ‘बिद्री’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटाची भूमिका जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, दत्ता उगले, नंदकुमार सूर्यवंशी, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी घाटगे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठी संधी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून पाटील यांनी चांगले कार्य केले आहे. म्हणूनच त्यांच्यासोबत राहण्याची आमची इच्छा आहे. आमदार सुरेश हाळवणकर आणि मंत्री पाटील यांच्याशी आमच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना आमच्यासोबत घेण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. जाईल तिथे गुण उधळणाºया हसन-किसन प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आम्ही दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु यापुढे पडद्यामागूनचे वार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि दहशत एका बाजूला असताना आम्ही केवळ सभासदांच्या विश्वासार्हतेच्या जोरावर ‘मिशन बिद्री’ यशस्वी करू. यामध्ये संजय घाटगेंची भूमिका लाखमोलाची असून, त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन आमच्या विजयाची मुहूर्तमेढच रोवली आहे.माजी आमदार दिनकरराव जाधव म्हणाले, के. पी. पाटील यांनी केवळ ‘बिद्री’ची सत्ता राखण्यासाठी सभासद वाढीचा एककलमी कार्यक्रम राबविला. देशात कुठल्याही कारखान्यात नाहीत एवढे कारखान्याशी दुरान्वये संबंध नसणारे सभासद करून ठेवले. यावरूनच त्यांच्या भोंगळ कारभाराची कल्पना येते. केवळ पै-पाहुण्यांचे हित जोपासून ‘बिद्री’ला राजकीय अड्डा बनविणाºया आणि ‘खोटे बोल, पण रेटून बोल,’ अशी प्रवृत्ती जोपसाणाºयांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करूया.

धनराज घाटगे यांनी स्वागत केले. के. जी. नांदेकर, दत्ता उगले, विजयसिंह मोरे, दिलीप पाटील (यमगे), आनंदा साठे (बोरवडे), आदींनी आपल्या मनोगतात ‘बिद्री’च्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. यावेळी ए. वाय. पाटील (म्हाकवे), अन्नपूर्णाचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सत्यजित जाधव, सिद्राम गंगाधरे, धनाजी गोधडे, संतोष ढवण, बालाजी फराकटे, विश्वजित जाधव, अन्नपूर्णाचे सचिव आकाराम बचाटे, राजू भराडे, आदी प्रमुख उपस्थित होते. दत्तोपंत वालावलकर यांनी आभार मानले.भेटलो म्हणजे गट बदलला नव्हेआम्ही राष्टÑवादी-भाजप आघाडीसोबत गेल्याच्या वावड्या उठल्या; परंतु के. पीं.चा पराभव हेच आमचे ध्येय आहे. म्हणूनच चंद्रकांतदादांनी निरोप दिल्यानंतर हसन-किसनच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचण्यासाठी आणि आमची त्यांच्या विरोधातील भूमिका स्पष्ट करण्यासाठीच आम्ही गेलो होतो. आपणही आमच्या आघाडीसोबत यावे, अशी विनंतीही त्यांना केल्याचे के. जी. नांदेकर आणि विजयसिंह मोरे यांनी स्पष्ट केले.मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीतआमदार मुश्रीफांनीच बँक संपविली. त्यांनाच अध्यक्ष केले गेले. दोन वर्षांनंतर मुश्रीफांचा राजीनामा घेऊन माजी आमदार पी. एन. पाटील यांना अध्यक्ष करण्याचे ठरले असताना देखील सत्तेची हाव असणारे मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीत.याला विरोध होईल म्हणूनच त्यांनी संचालकांना परदेश वारी घडवून आणली. हे जिल्ह्याचे केवढे मोठे दुर्दैव आहे, असे घाटगे म्हणाले.