शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची मुले, तर सातारच्या मुलांच्या संघाला विजेतेपद

By admin | Updated: December 26, 2014 00:08 IST

विभागीय कबड्डी : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघांची निवड

वाळवा : कोल्हापूर विभागीय (पायका) कबड्डी स्पर्धेत सांगली जिल्हा मुलांचा संघ विजेता ठरला, तर मुलींच्या विभागात सातारा जिल्हा संघ विजेता ठरला. यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचा मुले व मुलींचा अंतिम संघ निवडण्यात आला. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या क्रांतिवीरांगणा लक्ष्मीबाई नायकवडी क्रीडानगरीत या स्पर्धा पार पडल्या, तर मुलींच्या स्पर्धा शिवाजी व्यायाम मंडळाच्या क्रीडानगरीत पार पडल्या. मुलांच्या स्पर्धेचे उद्घाटन वैभव नायकवडी यांनी केले, तर मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले.मुलांच्या स्पर्धेत सांगली विरुद्ध कोल्हापूर हा अंतिम सामना रंगतदार झाला. यामध्ये सांगली जिल्हा संघ १६ गुणांनी विजेता ठरला, तर रत्नागिरी जिल्हा संघाने तृतीय क्रमांक पटकावला.मुलींच्या स्पर्धेत सातारा विरुद्ध सांगली यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये सातारा जिल्हा संघ १९ गुणांनी विजेता ठरला, तर सांगली जिल्हा संघ उपविजेता ठरला. कोल्हापूर जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या स्पर्धेत पंच म्हणून अजित भिलवडे, विलास गायकवाड, महेंद्र पवार, गुरू सनगरे यांनी काम पाहिले.यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला कोल्हापूर विभागाचा मुलांचा संघ असा : वीरधवल नायकवडी, हर्षल गायकवाड, मनोज पाटील, किरण घोडके (सर्व सांगली), शुभम पाटील, शुभम माने, केतन पाटील, सूरज पाटील (सर्व कोल्हापूर), प्रथमेश निकम (रत्नागिरी), प्रथमेश मोहिते (सातारा). मुलींचा संघ असा : सोनाली हेळवी, काजल इंगळे, संजुश्री तांबे (सातारा), गौरी निकम, प्राजक्ता ठोंबरे, नम्रता भोसले (सांगली), पूजा हासूरकर, शिवानी चव्हाण (कोल्हापूर), तेजल बिरजे, धनश्री जाधव (रत्नागिरी).स्पर्धेच्यावेळी सहायक जिल्हा क्रीडाधिकारी शंकर भास्करे, तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर उपस्थित होते. (वार्ताहर)