शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

पहिल्या टप्प्यात सांगलीकरांची निराशा

By admin | Updated: October 31, 2014 23:51 IST

राज्य मंत्रिमंडळ : खाडे, नाईकांना संधी शक्य

सांगली : भाजपला चार आमदारांचे बळ पुरवणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या वाट्याला राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात एकही मंत्रीपद न आल्याने जिल्ह्यात काहीशी नाराजी पसरल्याचे चित्र आहे.दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात पहिल्यांदाच जतमधून भाजपचे ‘कमळ’ फुलवून सुरेश खाडे आमदार झाले. त्यानंतर सलग दोनवेळा त्यांनी मिरजेतून भाजपला यश मिळवून दिले. त्यांच्यासोबत चारवेळा विधानसभेत प्रवेश करणारे शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचेही नाव मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल चर्चेत होते. आ. खाडे यांनी यंदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून, ते अनुसूचित जाती वर्गातील असल्याने ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधण्यासाठी त्यांना पहिल्या टप्प्यातच मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. आज (शुक्रवारी) सकाळपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती, तर मंत्रीपदाचा आणि प्रशासनाचा अनुभव व खा. राजू शेट्टी यांच्याशी जवळीक यामुळे नाईक यांना मंत्रीपद नक्की मिळणार, असे सांगितले जात होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘शिवाजीरावांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री करतो’ अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे नाईकांना मंत्रीपद दिले जाईल, अशी अपेक्षा सांगलीकरांना होती.गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातील पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील, मदन पाटील, अजितराव घोरपडे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. या ‘हेवीवेट’ मंत्र्यांमुळे राज्याच्या राजकारणात सांगलीचा दबदबा होता. आता भाजपच्या मंत्रिमंडळात खाडे, नाईकांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपद देऊन सांगलीचा दबदबा कायम राखला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात या दोघांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.(प्रतिनिधी)