शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दागिन्यांची तिजोरीच लंपास

By admin | Updated: February 8, 2016 23:25 IST

व्यापाऱ्याचा बंगला फोडला : सव्वाचार लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

सांगली : येथील गणपती पेठेतील व्यापारी कपिल किशोर कांकाणी यांचा वखारभागातील बंगला फोडून चोरट्यांनी सव्वाचार लाखांचे दागिने व रोकड असलेली तिजोरीच पळवून नेली आहे. चोरट्यांनी सुरुवातीला तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश न आल्याने तिजोरीच पळविली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. मात्र, कांकाणी यांनी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.कपिल कांकाणी यांचे गणपती पेठेत कांकाणी इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. त्यांचा वखारभागातील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेजवळ दोनमजली बंगला आहे. शनिवारी दुपारी साडेचार वाजता ते कुटुंबासह सातारा येथे नातेवाइकांकडे गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे ते दुसऱ्या मजल्यावर गेले. कपाट उघडून साहित्य विस्कटून टाकले. यामध्येही काहीच मिळाले नाही. शेवटी त्यांची नजर एका लहान लोखंडी तिजोरीवर गेली. ही तिजोरी त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी तिजोरीच पळवून नेली. तिजोरीत अमेरिकन डायमंड सेट, सोन्याचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र, अंगठी, चेन, रिंगा, चार नथ, पदक, नेकलेस, चांदीचे पूजेचे साहित्य व ३५ हजारांची रोकड असा ४ लाख २१ हजारांचा ऐवज होता.कांकाणी कुटुंब रविवारी सकाळी साडेअकरा वाजता साताऱ्याहून सांगलीत परतले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपअधीक्षक (गृह) रावसाहेब सरदेसाई, निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले होते. कांकाणी यांच्या घराजवळच श्वान घुटमळले. रात्री उशिरा कांकाणी यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)तिजोरी २५ किलोंचीकांकाणी यांच्या घरातील लोखंडी तिजोरी जुन्या काळातील होती. यामध्ये ते घरातील किमती ऐवज ठेवत होते. २५ किलो वजनाची ही तिजोरी होती. स्थानिक चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याची शक्यता आहे. दोन ते तीन चोरटे असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.