शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सांगलीत गायकवाडच्या घरावर छापा

By admin | Updated: September 17, 2015 00:50 IST

पोलिसांची कारवाई : कडेकोट बंदोबस्त, दिवसभर झडती, कुटुंबीयांचीही चौकशी सुरू

सांगली : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. मोती चौक) याला पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतल्याचे वृत्त बुधवारी दुपारी सांगलीत येऊन धडकताच एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या पथकाने समीरच्या घराचा ताबा घेतला असून, वीसजणांचे पथक येथे थांबून आहे. दिवसभर त्याच्या घराची झडती आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू होती. नागरिकांनी त्याच्या घरासमोर गर्दी केली होती. सांगलीच्या मोती चौकातील धनगर गल्लीत समीर गायकवाड याचे ‘भावेश्वरी छाया’ नावाचे घर आहे. मंगळवारी रात्री कोल्हापूर व सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केली. बुधवारी सकाळीच सांगली पोलिसांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, विश्रामबाग पोलीस ठाणे व सीआयडीच्या पथकाने त्याच्या घराचा ताबा घेतला. दिवसभर घराची झडती सुरू होती. त्याच्या घरात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. प्रवेशद्वारावर पोलीस थांबून होते. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, एलसीबीचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, विश्रामबागचे निरीक्षक अनिल चोरमुले यांच्यासह पंधरा ते वीसजणांच्या पथकाकडून घराची तपासणी सुरू होती. समीरची आई शांता, भाऊ सचिन, भावजय व पुतणे, आजोबा असा परिवार सांगलीत राहत आहे. त्यांच्याकडे दिवसभर कसून चौकशी सुरू होती. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याशी बोलू दिले जात नव्हते. समीरच्या घरात काही आक्षेपार्ह सापडले का, याबाबत मात्र पोलिसांनी मौन पाळले आहे. दिवसभर झडती सुरू असली तरी काही कागदपत्रे, छायाचित्रे पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेऊन कोल्हापूरला नेल्याचे समजते. (प्रतिनिधी) कोण हा समीर गायकवाड... समीर गायकवाड गेल्या सतरा वर्षांपासून सनातन संस्थेचा साधक आहे. त्याचे वडील विष्णू गायकवाड येथील आकाशवाणी केंद्रामध्ये शिपाई होते. सात वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. समीरला सचिन व संदीप असे दोन भाऊ असून, त्यापैकी एक सांगलीत, तर दुसरा संकेश्वर (कर्नाटक) येथे आजोळी असतो. समीरचे शिक्षण संकेश्वर येथेच झाले आहे. त्याचे कुटुंबच सनातनचे साधक असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्याची पत्नी सनातन संस्थेतच आहे, पण सध्या ते दोघे विभक्त झाल्याचे सांगण्यात आले. समीरने चार वर्षांपूर्वी सांगलीतील जवाहर चौकात मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू केले होते. काही वर्षातच त्याने हे दुकान बंद केले. त्यानंतर तो सांगलीतून गायब झाला. अधूनमधून तो सांगलीत येत असे, असे शेजाऱ्यांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याचे सांगलीत येणे-जाणे कमी झाले होते. ‘सनातन’शी संबंध समीरचे सनातन संस्थेशी घनिष्ठ संबंध आहेत. मडगाव (गोवा) येथील बॉम्बस्फोटातील सनातनचा साधक मृत मलगोंडा पाटील याचा तो मित्र होता. मलगोंडा सांगलीत असताना त्याच्याशी मैत्रीचे सूर जुळले होते. याच प्रकरणातील आणखी एका संशयिताशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. त्याची पत्नी डॉ. हर्षदा ही गोवा येथील सनातन संस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही समीर गायकवाड याच्याविरोधात सांगली पोलिसांत आजपर्यंत कोणताही गुन्हा नोंद नाही. तो पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे. तरीही पोलिसांनी सांगली, विश्रामबाग व मिरज शहर पोलीस ठाण्यातील संपूर्ण रेकॉर्ड तपासणी हाती घेतली आहे. यापूर्वी कोणता गुन्हा नोंद आहे का, याची खातरजमा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.