सांगली : एरोली (मुंबई) येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय स्केट इंडिया स्केटिंग स्पर्धेत सांगलीच्या चिमुकल्यांनी वेगवान खेळ करीत तेरा पदकांची कमाई केली़ महाराष्ट्र रोलर स्केटिंग असोसिएशन व नवी मुंबई स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ स्पर्धा ५०० मीटर व १००० मीटर रिंग रेस आणि रोड रेस अशा तीन प्रकारात पार पडली़ सांगलीतील यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक सूरज शिंदे, प्रदीप घडशी, विनायक पाटील, राहुल आनंदे व परवीन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले़ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर रोलर स्केटिंग असोसिएशनचे यशस्वी खेळाडू असे : १० वर्षे इनलाईन : वेदिका घडशी (तीन सुवर्ण), ६ वर्षे क्वाड : अमृता गायकवाड (दोन सुवर्ण व एक कास्य), ८ वर्षे क्वाड : दिया शिंदे (तीन कास्य), ६ वर्षे क्वाड : पलक प्रताप : (तीन कास्य), ८ वर्षे इनलाईन : मैत्रई पाटील (एक कास्य)़ साईश वडेर, चिराग शहा, श्रवण काळेल, सक्षम काळेल, अनिश पाटील, साई कणसे, अखिलेश ओतारी, मिहीर संभोई, स्वप्निल ढोंबे, श्रध्दा होनमोरे आदी खेळाडूंनीही कौशल्यपूर्ण खेळ केला़ (क्रीडा प्रतिनिधी)
स्केटिंगंंंंमध्ये सांगलीला तेरा पदके
By admin | Updated: February 20, 2015 23:10 IST