शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

सांगली, साताऱ्याची विजयी सलामी

By admin | Updated: January 7, 2015 00:56 IST

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा

सांगली : कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळप्रकारात सांगली व सातारा संघांनी विजयी सलामी दिली. येत्या गुरुवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एन. जे. पवार यांच्याहस्ते स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन होत आहे. यावेळी परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत. सांघिक खेळ प्रकारात हॉकीमध्ये पुरुषांमध्ये सातारा विरुद्ध पुणे व सांगली विरुद्ध सोलापूर शहर यांच्यात लढत होऊन यात सातारा व सांगली संघ विजयी झाले. फुटबॉलमध्ये सातारा विरुद्ध पुणे ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर शहर यांच्यातील लढतीत सातारा व कोल्हापूर संघ विजयी झाले. बॉस्केटबॉलमध्ये सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर विरुद्ध कोल्हापूर संघांमध्ये लढत झाली. यामध्ये सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर संघ विजयी झाले. महिलांमध्ये सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर शहर यांच्यामध्ये लढत होऊन सांगली, कोल्हापूर संघ विजयी झाले.व्हॉलिबॉलमध्ये पुरुष गटात सातारा विरुद्ध पुणे ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर ग्रामीण संघात झालेल्या लढतीत कोल्हापूर व सातारा संघ विजयी झाले. महिलांमध्ये सातारा विरुद्ध पुणे ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सोलापूर शहर यांच्यामध्ये लढत होऊन सातारा व कोल्हापूर संघ विजयी झाले. कबड्डीत पुरुष गटात सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व कोल्हापूर विरुद्ध सातारा संघात लढत होऊन सांगली व सातारा संघाने विजयी सलामी दिली. महिला गटात सांगली विरुद्ध सोलापूर ग्रामीण व सातारा विरुद्ध सोलापूर शहरमध्ये लढत झाली. यात सांगली व सातारा संघ विजयी झाले. हॅन्डबॉलमध्येपुरुष गटात सांगली विरुद्ध सातारा व सोलापूर शहर विरुद्ध सोलापूर ग्रामीणमध्ये लढत होऊन सांगली व सोलापूर शहर विजयी झाले. खो-खोत सोलापूर विरुद्ध पुणे ग्रामीण आणि सांगली विरुद्ध कोल्हापूर यांच्यात लढत होऊन पुणे ग्रामीण व सांगली संघ विजयी झाले. महिलांत कोल्हापूर व पुणे ग्रामीण संघ विजयी झाले. (प्रतिनिधी)कोल्हापूरच्या महिला खेळाडूंची आघाडीतिहेरी उडीत संतोष माळी (सांगली), थाळीफेकमध्ये सचिन जमदाडे (सातारा), पाच हजार मीटर धावणेत किरण बिंदगे (कोल्हापूर), ४०० मीटर धावणेत महिलांत कविता कदम (कोल्हापूर), पाच हजार मीटर धावणे मीनाताई देसाई (कोल्हापूर), थाळीफेकमध्ये स्वप्नाली पवार (पुणे ग्रामीण) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.