शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगली- कोल्हापूरचा महापूर केंद्र सरकारकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:49 IST

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना महापुराने जोरदार फटका दिला, सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक ...

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना महापुराने जोरदार फटका दिला, सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे, मात्र केंद्र सरकारने याची नोंद घेतलेली नसून शेजारच्या कर्नाटकातील पूरग्रस्त भागात मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने खास शिष्टमंडळ पाठवून नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यातील सर्वच नद्यांना ५ आॅगस्टपासून सलग दहा दिवस अनेक गावे आणि शहरांना महापुराने वेढले होते. सांगली आणि कोल्हापूर ही शहरेही पाण्याने वेढली गेली. जवळपास वीस नद्यांना पूर आला. त्याचे महाप्रलयी महापुरात रुपांतर होत हजारो एकर शेती पाण्याखाली गेली. कोट्यवधी रुपयांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. हजारो घरांची पडझड झाली. बाजारपेठांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारी मालमत्ताही या महापुराने उद्ध्वस्त झाली.राज्य सरकारने या महापुरामुळे बाधित झालेल्यांना तातडीची सानुग्रह अनुदान देण्यास सुरूवात केली. शेती आणि व्यापार उद्योगांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, या महापुराची केंद्र शासनाकडून अजिबात दखल घेण्यात आली नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसानीचा प्राथमिक अंदाज सुमारे सहा हजार कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करून त्यापैकी चार हजार कोटी रुपये केंद्र शासनाकडून मदत मागितली जाईल, असे सांगण्यात आले.याउलट केंद्र सरकारला या महापुराच्या गंभीर परिणामांची जाणिव करून देण्यात राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. शेजारच्या कर्नाटक राज्याने मात्र कृष्णा खोºयात आलेल्या या महापुराची गांभिर्याने नोंद घेतली. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दोन आठवड्यात तीनवेळा उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. विभागीय पातळीवर तातडीच्या बैठका घेतल्या. केंद्र सरकारला या महाप्रलयी महापुरामुळे झालेल्या हानीची कल्पना दिली. परिणामी चार केंद्रीय मंत्र्यांनी बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड आदी जिल्ह्यांचा दौरा करून पूरग्रस्त भागांची पाहणी केली.दरम्यान, राज्य सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने संयुक्त सचिव श्री. प्रकाश यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱ्यांची एक समिती तातडीने कर्नाटकातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाठविली. गेल्या शनिवारपासून सलग चार दिवस सीमावर्ती बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यांसह धारवाड तसेच हावेरी, कारवार आदी जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन महापुराने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. कर्नाटकाने तातडीने पावले उचलल्याने केंद्र सरकारने याची नोंद घेऊन उच्च अधिकार समिती पाठविली आहे. महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी भाजपपासून विरोधी पक्षदेखील निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले आहेत. त्यांनीदेखील याची मागणी लावून धरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने दखलही घेतलेली नाही.