सांगली : बीड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर जंपरोप स्पर्धेत सांगली जिल्ह्याने एक सुवर्णपदक, चार रौप्यपदक व चार कास्यपदक अशी नऊ पदके पटकावली़ सांगली जिल्हा संघातील विजेते खेळाडू असे : प्रणाली पाटील (सुवर्णपदक), ऋतिका जाधव, श्रृती बेरगळ, खुशी शिनगाडे, कृष्णा पुजारी (चौघींना रौप्यपदक), विराज फारणे, शिवतेज फारणे, मनीष पाटील, शिवम पाटील (चौघांना कांस्यपदक)़ यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक विनायक ऐनापुरे, राहुल पाटील व गावडे यांचे मार्गदर्शन लाभले़ (क्रीडा प्रतिनिधी)
जंपरोप स्पर्धेत सांगलीला नऊ पदके
By admin | Updated: January 21, 2015 23:57 IST