सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या (बुधवार) शेवटच्यादिवशी ८६ जणांनी माघार घेतली. जिल्ह्णातील आठ मतदारसंघांतून मैदानात उतरलेल्या २२५ उमेदवारांपैकी ११८ जणांचे अर्ज छाननी आणि माघारीनंतर बाहेर गेल्याने आता १०७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारांना आजच चिन्हांचे वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्णातून एकूण २२५ जणांनी ३५९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी आणि कालच्या दिवसातील माघारीनंतर १९३ जणांची उमेदवारी राहिली होती. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८६ जणांनी माघार घेतली. सर्वाधिक उमेदवार सांगली मतदारसंघात असून, येथे १९ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिराळा मतदारसंघात नऊ उमेदवार आहेत. मतदारसंघउमेदवार --सांगली१९---मिरज१७ ---इस्लामपूर१३ --शिराळा९--पलूस-कडेगाव ११---खानापूर१३--तासगाव-क.म.१४जत११--एकूण१०७
सांगली जिल्ह्यातून १०७ जण निवडणुकीच्या रिंगणात
By admin | Updated: October 2, 2014 00:18 IST