शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली--‘डीसीसी’ची हलगी

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय. इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी

सांगली डीसीसी बँकेची निवडणूक जेमतेम आठवड्यावर आलीय. काल म्हणे ‘डीसीसी’चा मराठी लाँगफॉर्म ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ याऐवजी ‘डब्यात चाललेली चोरांची बँक’ असा कुणीतरी केल्याची आवई उठली! तसा बोर्डही मागच्या बोळात गुपचूप लावला गेला म्हणे! (जतच्या जगताप साहेबांना विचारायला पाहिजे. असल्या भन्नाट आयडीया त्यांनाच सुचतात!)... असं असलं तरी जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय.कालपरवापर्यंत इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी केली. यात संजयकाका आणि जगताप साहेबांची चतुराई कामी आली, पण यामुळं सोनसळचे साहेब जाम चिडले. त्यांनी विशालदादाला हाताशी धरून नवं पॅनेल उतरवलं. अर्थात दोन ठिकाणी माणसं मिळाली नाहीत आणि दोन जागांवर ‘अभद्र युती’ची (हे मोहनशेठचं म्हणणं हं.) माणसं बिनविरोध निवडून आल्यानं चार जागांनी ते मागं राहिलेत, ही गोष्ट अलाहिदा. मोहनशेठ, विशालदादा आणि सोनसळच्या साहेबांचा संताप तसा सात्विकच! कारण मदनभाऊंच्या साथीनं संजयकाका आणि जगताप साहेबांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला आणि त्यामुळं इस्लामपूरच्या साहेबांना गुदगुल्या झाल्या. मग तो संताप सात्विक नसेल तरच नवल! खरं तर त्यांना एकत्र पॅनेलमध्ये घेतलं असतं तर एवढं आकांडतांडव केलं असतं का? (हे म्हणणं मात्र दिलीपतात्यांचं बरं का!) उलट सगळ्यांनी हातात हात घालून ‘व्हिक्टरी’ची दोन बोटं वर करत वाकुल्या दाखवल्या असत्या. मागच्या निवडणुकीत असंच झालं नव्हतं का! सगळ्यांनी जागा वाटून घेतल्या (नव्हे खाल्ल्या) होत्या. अपवाद फक्त विशालदादाचा. त्यावेळी इस्लामपूरकरांच्या खेळीनं ‘महाभारत’ घडलं होतं. भाऊंचे शिलेदार जमादारसरांनी विशालदादांना आस्मान दाखवलं होतं. आता तर एका गटात एकही सोसायटी हातात नसताना थेट मदनभाऊंशी झुंजायला लागतंय... तर दुसऱ्या गटात आर. आर. आबांच्या सुरेशभाऊंशी कुस्ती लागलीय. काही झालं तरी दादा घराण्याच्या पदरी नामुष्की आहेच.तसं पॅनेलच्या जुळवाजुळवीआधी सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला इस्लामपूरकरांना दिला होता. त्यात त्यांचा रोख संजयकाका आणि जगताप साहेबांवर होता... पण खेळी तिथंच उलटली. आधीच तासगाव आणि नागेवाडीच्या कारखान्यावरून संजयकाका त्यांच्यावर खार खाऊन आहेत, तर जतमधील पाहुण्या-रावळ्यांच्या राजकारणामुळं जगताप साहेब आणि कदम मंडळींतून विस्तव जात नाही. त्यात सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला दिला... तोही इस्लामपूरकरांना! कमळाबाई आणि इस्लामपूरकरांचं नातं माहीत असताना सोनसळच्या साहेबांनी असं करावं? झालं! ते सांगलीत यायच्या आधीच मध्यानरात्री काका आणि जगताप साहेबांनी भाऊंना पटवलं. महापालिकेचं एकमेव सत्ताकेंद्र हातात असलेल्या भाऊंनी नमतं घेत इस्लामपूरकरांशी जुळवून घेतलं. दोनदा आमदारकी हुकलीय, पुढं बाजार समितीचं इलेक्शन आलंय. परत काही ‘वाईटवंगाळ’ व्हायला नको, असा विचार भाऊंनी केलाय म्हणे. (काल सोनसळच्या साहेबांनीही हेच सांगितलं...) इस्लामपूरकरांनाही नेमकं हेच पाहिजे होतं. एका दगडात त्यांनी पाखरांचा थवाच खाली पाडलाय. यंदा त्यांनी मानसिंगभाऊ, दिलीपतात्यांना बिनविरोध निवडून आणलंय. मानसिंगभाऊंना बँकेचं ‘चेअरमन’पद देऊन पुनर्वसन करण्याचा बेत दिसतोय, असं घड्याळवाले सांगताहेत... पण ते पुढच्या पुढं. तूर्त तरी संजयकाकांच्या भाषेत ही हलगी तापलीय. आता वाजंलही... त्याला घुमक्याची साथ मिळंल आणि त्यावर दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या, साहेब मंडळी झिम्माड लेझीम खेळायला लागतील...जाता-जाता : शिराळ्याचे नाईक साहेब वेळीच सावध झाल्यानं त्यांच्या रणधीरला बाद करायचा डाव मात्र उधळून लावला गेला. कमळाबाईशी इमान राखत (...आणि इस्लामपूरकरांची खेळी ओळखत) त्यांनी सोनसळकरांच्या पॅनेलकडं पाठ फिरवली. विट्याच्या सदाभाऊंचे चिरंजीव वैभवरावांनीही सोनसळकरांचा हात झिडकारला. कारण सोनसळकर आणि अनिलभाऊंची ‘फिक्सिंग’ त्यांना विधानसभेपासून सलतीय. यात घोरपडे सरकारांचा मात्र पुरता ‘मामा’ झाला. कमळाबाईच्या यादीतून त्यांचं नाव कापलं गेलं. (काकांनीच ही ‘गेम’ केल्याची कुजबूज कवठ्याच्या दूध संघात ऐकायला येतेय...) म्हणून सरकारांनी आपला मोहरा सोनसळकरांच्या पॅनेलमधून पुढं केलाय. ‘जाने कहाँ गये वो दिन...’ असं गाणं हल्ली त्यांच्या ‘स्कॉर्पिओ’मध्ये सारखं लावलं जातंय...- श्रीनिवास नागे