शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली --चक्का जाम!

By admin | Updated: January 31, 2017 23:48 IST

मराठा समाज दोन तास रस्त्यावर : ४७४ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी सांगलीसह सर्वत्र दोन तास ‘चक्का जाम’ आंदोलन झाले. त्यामुळे अनेक मार्गांवर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. ६ मार्चपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मंत्र्यांना फिरू द्यायचे नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील ४७४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, काही वेळाने सोडून दिले. जिल्ह्यात सर्वत्र या आंदोलनास पाठिंबा मिळाला. सांगलीत अंकली फाटा, इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, कर्नाळ रस्ता, कुपवाड रस्त्यावर भारत सूतगिरणी, सांगलीवाडी टोल नाका, माधवनगर रस्त्यावर साखर कारखान्यासमोर, पुणे-बंगलोर महामार्गावर वाघवाडी फाटा, मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा, आष्टा, बावची फाटा, घाटनांद्रे, नागज फाटा, दिघंची, आटपाडी, देशिंग, भिवघाट, कवठेमहांकाळ, जत, उमदी, पलूस, कडेगाव, रामानंदनगर, पाचवा मैल, भिलवडी, अंकलखोप, वसगडे, कवठेएकंद, तासगाव, शिराळा, कासेगाव येथे ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ४७४ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन, काही वेळाने सोडून दिले.आंदोलनात तरुणांचा सहभाग मोठा होता. जिल्हाभर आंदोलन करून मराठी बाणा दाखवून दिला, असे संजय देसाई व डॉ. संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. सांगलीतील आंदोलनामध्ये पृथ्वीराज पवार, शिवाजी मोहिते, संग्राम चव्हाण, सतीश साखळकर, योगेश पाटील, श्रीरंग पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पोळ, विजय भोसले, योगेश पाटील, सुधीर भगत, नीलेश पाटील, महेश खराडे, सुधाकर पाटील, माधवनगर रस्त्यावर अक्षय पाटील, आटपाडी येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, तर आष्ट्यात वैभव शिंदे, सुयोग औंधकर सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)