शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पुन्हा १६ वर्षे टोल !

By admin | Updated: August 5, 2015 00:30 IST

न्यायालयाचा निर्णय : शासनाला अधिसूचना प्रसिद्धीचे आदेश

सांगली : ‘अशोका बिल्डकॉन’ कंपनीस सांगलीतील टोलवसुलीकरिता दिलेल्या मुदतवाढीबाबत यापूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी दिले. त्यामुळे कंपनीला पुढील १६ वर्षे सांगलीत टोलवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची माहिती कंपनीचे वकील एस. एस. शेठ यांनी दिली. सांगलीतील आयर्विन पुलाला पर्यायी पूल व बायपास रस्ता बांधणीचे काम राज्य शासनाने ‘अशोका बिल्डकॉन लिमिटेड’ या कंपनीला दिले होते. त्यानुसार २३ मार्च १९९९ ला वर्क आॅर्डर देण्यात आली होती, तर आॅक्टोबर २००० पासून टोलवसुलीला सुरुवात झाली होती. कंपनीला १५ वर्षे तीन महिन्यांसाठी टोलवसुलीची परवानगी करारात दिली होती. यासाठी सांगलीवाडी आणि बायपास रस्त्यावर दोन नाके उभारण्यात आले होते. दरम्यान, २००५ आणि २००६ मधील महापुरावेळी काही दिवस बायपास व आयर्विन पुलावरील वाहतूक बंद झाली होती. रस्तेही खराब झाले होते. त्यामुळे कंपनीने झालेले नुकसान व वाढीव खर्चाचा दावा करून वसुलीसाठी मुदतवाढ मागितली होती. यासंदर्भात नेमलेल्या लवादाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नसल्याने कंपनीने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने मुदतवाढीचाच निर्णय दिला होता. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील शासनाची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात यासंदर्भात पाठपुरावा झाला नसल्याने हे प्रकरण न्यायालयीन पटलावर आले नाही. दरम्यान, कंपनीने जिल्हा न्यायालयात यापूर्वीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आदेश देण्याची दरखास्त (मागणी) दाखल केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून राज्य शासनाने पूर्वी झालेल्या निर्णयाप्रमाणे मुदतवाढीचा कालावधी गृहीत धरून अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसंगी कंपनीला टोलवसुलीकरिता पोलीस संरक्षण देण्याची सूचनाही दिली आहे. सवलतीचा कालावधी मान्य करून शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा कंपनीला आहे. न्यायालयीन आदेशानुसार आता कंपनीला टोलवसुलीचा मार्ग मोकळा झाला. लवकरच पोलीस संरक्षणाची मागणी आम्ही करणार असल्याचे अ‍ॅड. शेठ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)टोल बंदच्या आदेशाचे काय होणार ?राज्यातील छोटे टोल बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी काढला होता. या आदेशात सांगलीतील या टोलनाक्याचाही उल्लेख होता. आता न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी होणार की, नुकसानभरपाई देऊन शासन टोल बंदच्या निर्णयावर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आंदोलनामुळे पोलीस संरक्षणसांगलीत हा टोल बंद करण्याबाबत २०१३ मध्ये सर्वपक्षीय आंदोलनाला सुरुवात झाली. टोलनाक्यावर हल्लाही करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी हाकलून लावले होते. हे आंदोलन पेटले असतानाच शासनस्तरावर दबाव वाढला. त्यामुळे २९ जानेवारी २०१४ रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी हा टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा टोल सुरू होऊ शकला नाही. ‘टोलचा वाद आणि लवादअशोका बिल्डकॉन’ कंपनीने एक कोटी २० लाखांच्या वाढीव खर्चाचा व महापुरात झालेल्या नुकसानीचा दावा केला होता. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर लवादाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. यासंदर्भात आणखी एक लवादही नेमण्यात आला होता. त्यावेळी या लवादाने शासनाच्या बाजूने निकाल दिला होता. पहिल्या लवादानुसार न्यायालयीन लढाई कंपनीने जिंकली होती. त्यानंतर आता दरखास्तीनुसार न्यायालयाने टोलसंदर्भातील निकाल दिला आहे.